शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:43 IST

स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या न्यायहक्क, सन्मानासाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय ठरते,

ठळक मुद्देकपिलवृक्ष गोडघाटे यांचे प्रतिपादन : स्त्री मुक्तीवर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या न्यायहक्क, सन्मानासाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य अतुलनीय ठरते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे विधी सल्लागार अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे यांनी केले.महाराष्ट्र अंनिस, राष्ट्रसेवा दल व अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्यावतीने आयोजित ४० व्या अभ्यासवर्गात ‘भारतीय स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, बुरसटलेल्या समाजव्यवस्थे विरूद्ध लढा देत महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. त्यांनी स्त्रीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. मानवतेचा तोच धागा पकडून डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांकरिता कार्य केले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या उन्नतीसाठी आग्रही असणारे डॉ. आंबेडकर हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देणारे एकमेव भारतीय होते. परंतु आज मात्र हिंदू स्त्रियांचे विरोधक म्हणून डॉ. आंबेडकर यांचा अपप्रचार केल्या जातो. यासाठी भारतातील प्रत्येक स्त्रीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.मंचावर संस्थापक जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, तालुकाध्यक्ष अरूण चवडे, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, रजनी सुरकार, सुधीर गवळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले. प्रास्ताविक व अतिथी परिचय सुनील ढाल यांनी दिला. आभार प्रदर्शन संजय भगत यांनी केले.कार्यक्रमाला प्रकाश कांबळे, भीमसेन गोटे, अभिनय हिवंज, किशोर ढाले, अ‍ॅड. भास्कर नेवारे, नितीन झाडे, किशोर जगताप, मुकूंद नाखले आदींनी सहकार्य केले. व्याख्यानाकरिता अंनिस पदाधिकारी व गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.