शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर चौकात मूकमोर्चाचा समारोप

By admin | Updated: October 24, 2016 00:27 IST

मूकमोर्चा मुख्य मार्गाने जात सोशालिस्ट चौक मार्गे बजाज चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे निघाला.

वर्धा : मूकमोर्चा मुख्य मार्गाने जात सोशालिस्ट चौक मार्गे बजाज चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे निघाला. बजाज चौकात आर्वी नाक्याप्रमाणेच गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी सर्वांचे लक्ष वेधणारी होती. बजाज चौकातून हा मोर्चा इतवारा चौकमार्गे समारोप होणार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. येथे साक्षी घुडे आणि अनुश्री नागपूरे या दोन युवतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर या मूकमोर्चाचे रुपांतर एका भव्य सभेत झाले. या सभेला कोण्या नेत्याने नव्हे तर चार युवतींनी मार्गदर्शन केले. यात रूतूजा मिसाळ, आयुषी चव्हाण, श्रद्धा बारोकर व आकांक्षा काकडे यांचा समावेश होता. त्यांनी मराठा-कुणबी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात हा मोर्चा असल्याचे यावेळी सांगितले. मोर्चाच्या प्रारंभापासून तर समारोपापर्यंतच्या कार्यक्रमाचे संचालन यवतमाळ येथील कैलास राऊत यांनी केले. मूकमोर्चात सहभागींचे आभार तुषार उमाळे यांनी मानले. राष्ट्रगीताने मूकमोर्चाचा समारोप झाला. दोन ठिकाणी ड्रोन कॅमेरे मूकमोर्चा निघणार असलेल्या मैदानावर आणि शिवाजी चौक येथे आयोजकांच्यावतीने ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ती वर्धेकरांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरली. ड्रोण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मूकमोर्चामध्ये जमलेल्या जनसमूदायाचे चित्रण करण्यात आले. शिवाजी चौकातील ड्रोन कॅमेरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सर्वांच्या नजरा कॅमेऱ्याकडे लागल्या होत्या.