शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची जिल्ह्यात जय्यत तयारी

By admin | Updated: April 9, 2016 02:21 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव....

वर्धेत चार दिवसीय महोत्सव : प्रबोधनात्मक कार्यक्रमवर्धा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्ह्यात व्यापक स्वरुपात साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. वर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने ११ ते १४ एप्रिलपर्यंत स्थानिक पोलीस ग्राऊंड येथे भव्य स्वरुपात जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. चार दिवस विविध प्रबेधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरातील मुख्य रस्ते व शहरातील थोरांच्या पुतळ्यांचा परिसर रोषणाईने सजविण्यात येत आहे.सोमवारपासून (दि.११) या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. उद्घाटक म्हणून निवृत्त आय.ए.एस. अधिकारी इ.झेड. खोब्रागडे, तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, आयबीएन लोकमतचे सिनियर प्रोड्यूसर विनोद राऊत व आंबेडकर विचारवंत अ‍ॅड. प्रेम ताकसांडे उपस्थित राहतील. देखाव्यातून घडणार बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचे दर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावा या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. डॉ. आंबेडकर चौकात हा देखावा साकारण्यात येणार आहे. दि.११ ते १४ एप्रिलपर्यंत तो सर्वांसाठी खुला राहणार आहे.शहरात रोषणाई, सर्वधर्म समभावाचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सवानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा परिसराला आकर्षकरित्या सजविण्यात येत आहे. शहरातील मुख्य मार्गावर रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे रात्रीला झगमगाटात शहराचे सौंदर्य खुलून दिसणार आहे. शिवाय शहरातील थोर मानवांच्या पुतळ्यांनाही रोषणाई करण्यात आल्यामुळे सर्वधर्म समभावाचा संदेशही यातून दिला जात आहे.