शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर हे खरे राष्ट्रनिर्माते होते

By admin | Updated: April 12, 2017 00:25 IST

जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, ...

मैत्रीवीर नागार्जून : ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही व बौद्धधर्म’वर व्याख्यानवर्धा : जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, अशी क्रांतीकारी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय, असे मत हैद्राबाद येथील सेंट्रल विद्यापीठाचे प्रा. डॉ. मैत्रीवीर नागार्जून यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीसह त्रिरत्न व बौद्ध महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यादीप सभागृहात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेत ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही आणि बौद्धधर्म’ विषयावर ते बोलत होते. पहिल्या दिवशी धम्मचारी नागकेतू तर दुसऱ्या दिवशी हिंदी विद्यापीठाचे डॉ. सुरजित अध्यक्षस्थानी होते.डॉ. नागार्जून पूढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे एक महान राष्ट्रनिर्माते होते. लोकशाही व बौद्धधर्माला अभिप्रेत खऱ्या राष्ट्रवादाचा पाया त्यांनी घातला. आजचा असमानतायुक्त राष्ट्रवाद त्यांना अभिप्रेत नव्हता. घटनेच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मुल्यांचा अंतर्भाव असला तरी या मुल्यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. अमर्याद स्वातंत्र्य हे समतेच्या तत्वाला संकुचित करू शकते म्हणून बंधुत्वाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. केवळ बंधुत्व हे सुद्धा पुरेसे नसून त्याला मैत्रीची जोड त्यांनी दिली आणि म्हणून बुद्धाच्या तत्वावर हे तीनही मुल्ये आधारित आहेत, हे त्यांनी जगाला निक्षून सांगितले. आज मात्र आपल्या मताशी सहमत नसणाऱ्यांची अराष्ट्रीय वा राष्ट्रद्रोही, अशी निर्भत्सना केली जाते. हा लोकशाहीचा संकोच आहे. म्हणून समतायुक्त समाजाची निर्मिती करणे हाच डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत राष्ट्रवाद आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.यावेळी नरेन मून व प्रा. गौतम तेलतुबंडे यांनी संपादित केलेल्या बौद्ध जीवन मार्ग या उर्गेन संघरक्षित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक त्रिरत्न बौद्ध महासंघ वर्धा केंद्राचे अध्यक्ष धम्मचारी हर्षवरी यांनी केले तर आभार वर्धा बुद्धीष्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी मंजूकिर्ती यांनी मानले. वक्त्यांचा परिचय व कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्ञानेन्द्र मुनेश्वर यांनी केले. दोन्ही दिवसाच्या व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थित, हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.(कार्यालय प्रतिनिधी)