शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

१५० व्या गांधीजयंतीनिमित्त राज्यभर राबविणार ‘दान उत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:27 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) च्यावतीने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये दान उत्सव (फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग) राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे लोकसहभाग मिळविण्याकरिता परिवर्तनसाथी आठवडाभर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) च्यावतीने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये दान उत्सव (फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग) राबविला जाणार आहे. गांधी जयंतीपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून ८ ऑक्टोंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाकरिता लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी स्वयंसेवकांची मोहीम ‘परिवर्तनसाथी’ प्रयत्नरत आहेत.महाराष्ट्रातील १ हजार गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे मिशन व्हीएसटीएफ महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांमध्ये दान उत्सव साजरा करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८७ हून अधिक तालुके व ३२३ ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. या मोहिमेमध्ये स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शासन अशा विविध कृतींचा समावेश असणार आहे. यापूर्वी यापैकी अनेक कृती शहरांमध्ये राबविण्यात आल्या आहेत. पण, यंदा एमव्हीएसटीएफसह लोकांना मोठ्या संख्येने घेऊन या थोर कार्यासाठी गावकऱ्यांसह खांंद्याला खांदा लावून काम करण्याची अनोखी संधी आहे. तसेच स्वयंसेवक उपक्रमाच्या सादरीकरणाची घोषणा करीत एमव्हीएसटीएफने शहरी व ग्रामीण भागांमधील संस्था व लोकांना परिवर्तनसाथी बनण्याचे आणि गावाच्या सामाजिक विकासासाठी गावकऱ्यांसोबत सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. परिवर्तनसाथी बनण्यासाठी संकेतस्थळावर स्वयंसेवक म्हणून नाव, संपर्क क्रमांक आणि जिल्हा व पसंतीचे गाव अशी माहिती मेल करावी. नोंदणीकरिता अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०१९ मध्यरात्रीपर्यंत आहे. संस्था व स्वयंसेवकांनी अगोदरच पुढाकार घेतला असून ते जिल्हा परिषद शाळांचे सुशोभिकरण, शिक्षण प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन कार्यशाळांचे आयोजन, ग्रामीण भागांच्या आर्थिक साक्षरतेसंदर्भात काम, गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवित आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेचे नेतृत्व संबंधित गावांमधील मुख्यमंत्री ग्रामीण विकास सहकारी (सीएमआरडीएफ) करणार आहेत. सीएमआरडीएफ, गावकरी, गावातील अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या सहभागाची खात्री घेतील. ‘फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग’ आठवडा विविध सामाजिक विकास थिम्स राबविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

दानउत्सवाबाबत...दानउत्सव (पूर्वीचा जॉय ऑफ गिव्हिंग विक) हा भारताचा ‘फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग’आहे. २००९ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फेस्टिव्हल दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जातो. जगभरातील विविध लोक एकत्र येत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. दानउत्सवासाठी कोणा एकालाच श्रेय देणे अशक्य आहे. नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान विविध व्यक्ती आणि एनजीओ लिडर्सनी पुढाकार घेऊन ‘इंडिया गिव्हिंग विक’ सुरू करण्याचे ठरविले आहे.सहा दशलक्षाहून अधिक लोक देणार दानविविध कार्यक्षेत्रांमधील कॉर्पोरेट्स कंपन्या, परोपकारी संस्था, व्यावसायिक लिडर्स, स्थानिक अधिकारी व संस्था अशा विविध भागधारकांचा सहभाग व सहयोग वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स ते मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी ते सेलिब्रिटी असे ६ दशलक्षांहून अधिक लोक महात्मा गांधीजी यांना मानवंदना म्हणून दान उत्सवाच्या आठवड्यादरम्यान समाजाचे ऋण म्हणून त्यांचा वेळ, पैसा, संसाधने किंवा कौशल्ये दान स्वरूपात देणार आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी