लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील मांडगाव नजीक सावंगी (देर्डा) गावातील लोकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. सेवाग्राम-समुद्रपूर मार्गावरून दक्षिणेस दोन किलोमिटर अंतरावर असलेली वस्ती म्हणजे सावंगी. येथे बोर आणि धाम नदीचा संगम असल्याने या संगमावर नागरिकांची चांगलीच वर्दळ असते.हमदापूरकडे जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने या भागातील नागरिकांची येथून ये-जा असते. या रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडा खचल्या असल्याने त्या कधी वाहून जातील याचा नम राहिलेला नाही. यामुळे या रस्त्याकडे संबंधित विभागाले लक्ष देत कार्यवाही करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांत अपघात होवून एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येता नाही. अशातच एका नागरिकाची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्य खड्ड्यात गेल्याने किरकोळ जखमी झाला. यावेळी इतर लोकांच्या मदतीने दुचाकी बाहेर काढताना दिसत आहे.दुचाकी शिरली खड्ड्यातरस्त्याच्या कडेला पडलेल्या खड्ड्यात एक दुचाकी घसरून पडली. या दुचाकीची गती कमी असल्याने विशेष घटना घडली नाही. यात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. यावेळी रस्त्याने जात असलेल्या दुसºया नागरिकांच्या मदतीने ही दुचाकी काढण्यात आली. येथे मोठ्या अपघाताची शक्यता असल्याने हा खड्डा बुजविण्याची मागणी आहे.
बोथुडा पाटी ते सावंगी (देर्डा) मार्गाची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:08 IST
तालुक्यातील मांडगाव नजीक सावंगी (देर्डा) गावातील लोकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. सेवाग्राम-समुद्रपूर मार्गावरून दक्षिणेस दोन किलोमिटर अंतरावर असलेली वस्ती म्हणजे सावंगी.
बोथुडा पाटी ते सावंगी (देर्डा) मार्गाची दैनावस्था
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे