शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:51 IST

श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.

ठळक मुद्देभीतीयुक्त वातावरण । नगरपालिका, ग्रामपंचायतींचे बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. श्वानाने चावा घेतल्याने एका वृद्धाला जीव नुकताच गमवावा लागला. मात्र, या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे पालिका, संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.नगरपालिकेच्या हद्दीतील महादेवपुरा, हवालदारपुरा, गोंडप्लॉट, सुदामपुरी, मालगुजारीपुरा, इतवारा बाजार तर शहरालगतच्या नालवाडी, साटोडा, आलोडी , पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोकाट, बेवारस श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. पिसाळलेले, आजारग्रस्त श्वानांची संख्यादेखील मोठी आहे. यामुळे आजार बळावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बंदोबस्त करण्याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक भीतीयुक्त वातावरणात वास्तव्य करीत आहेत. पालिका, ग्रामपंचायतीने या समस्येची दखल न घेतल्यास बेवारस श्वानांमुळे अनेक बळी जाण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.शिकवणीला जाणारे विद्यार्थी दहशतीतनालवाडी व साटोडा, पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलोडीसह अनेक वॉर्डांत बेवारस श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून पहाटे शाळा आणि शिकवणीवर्गाला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.पुलफैलात ज्येष्ठाला गमवावा लागला जीवशहरातील विविध बेवारस श्वानांनी मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांनी प्रचंड चैदोस घातला आहे. अशाच एका बेवारस श्वानाने पुलफैलातील देविदास मोतीराम गजभिये या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला. यात त्यांना रेबीजची बाधा झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांनी श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधित नगरसेवक, पालिकेकडे मागणी केली होती. मात्र, कायम दुर्लक्ष करण्यात आले. यातच या ज्येष्ठाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :dogकुत्रा