शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:32 IST

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात.

ठळक मुद्देएकाच दिवशी ६५ प्रकरणे : पालकांना बोलावून दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात. यासाठी पालकांनाच समज देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत ६५ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. अशी कारवाई टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे काय, हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्गाला जाण्यासाठी आता मुलांना मोटरसायकल, मोपेड घेऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश विद्यार्थी दुचाकी वापरतात; पण ड्रायव्हींग लायसन्स काढण्याचा साधा विचारही त्यांच्या वा त्यांच्या पालकांच्या मनात डोकावत नाही. मग, कुठली अनुचित घटना घडली तर पोलिसांवरच दोष दिला जातो. सध्या वर्धा शहरासह जिल्ह्यात हा प्रकार वाढीस लागला आहे. अल्पवयीन वाहन चालकांची संख्या वाढतीवर आहे; पण त्या प्रमाणात ड्रायव्हींग लायसन्स काढले जात नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.खरोखर अल्पवयीन दुचाकी चालक म्हणजेच विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे काय, हे तपासण्यासाठी १६ फेबु्रवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलीस शाखेद्वारे चाचणी म्हणून कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाजवळ राबविलेल्या या मोहिमेत तब्बल ६५ विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स नसल्याचे समोर आले. वाहतूक पोलिसांनी ३५ प्रकरणे तर आरटीओद्वारे ३० प्रकरणांची नोंद घेण्यात आली. यातील दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. पालकांनी संपर्क साधल्यानंतर समज देत दुचाकी परत केल्यात. ही मोहीम अल्पवयीन तथा ड्रायव्हींग लायसन्स नसलेल्या मुलांविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. अशा मोहीम आता नेहमी राबविल्या जाणार असल्याचेही वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख दत्तात्रय गुरव यांनी सांगितले. यामुळे पालकांनी पाल्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे की नाही, हे तपासणे व नसेल तर त्याची तरतूद करणे गरजेचे झाले आहे.एक दिवसाची मोहीम पुरेशी आहे काय?आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने अल्पवयीन दुचाकी चालकांविरूद्ध एक दिवस कारवाईची मोहीम राबविली. एका दिवसांत ६५ प्रकरणेही नोंदविली; पण एक दिवसाची मोहीम नियम पाळणे शिकविण्यासाठी पूरेशी आहे काय, हा प्रश्नच आहे.पालकांना जबाबदारीचे भान हवेआपल्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी घेऊन देत असताना त्यांना वाहन व्यवस्थित चालविता येते काय, वाहतूक नियम माहिती आहेत काय हे माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय वाहन देत असताना ड्रायव्हींग लायसन्स काढून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही पालकांची प्रमुख जबाबदारी असताना त्याचे कुणाला भान नसल्याचेच दिसते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस