शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विकण्याची घाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:04 IST

खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभाव वधारण्याची शक्यता : चीनसोबत भारताचा करार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस व सोयाबीन हे दोन प्रमुख पीके आहे. सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या विविध बाजारपेठेत सोयाबीनचे दर हे तीन हजाराच्यावर आहेत. हिंगणघाट बाजार पेठेत १५ आॅक्टोबरला सोयाबीन ३ हजार १५५, सेलू बाजारपेठेत ३ हजार ७० रूपये भाव होता तर समुद्रपूर येथे मंगळवारी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तेथे ३ हजार ८५ रूपये भाव सोयाबीनला देण्यात आला. ही बहुतांश खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या नाफेडमार्फत अजूनही सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याने सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ झाले आहे. केंद्रसरकारने सोयाबीनवर आयात शुल्क ४४ टक्के केले असून सोयाबीनच्या निर्यातीवर १० टक्के सबसीडी जाहीर केली आहे. राज्य सरकारने ४० लाख मॅट्रीक टन, सोयापेंड निर्यात करण्याचा करार चीन सोबत केल्याने सोयाबीनला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उतारा कमीयंदा वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ ७७ टक्केच पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एकरी अडीच पोत्यांचाच उतारे आले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. जागतीक बाजारपेठेतही सोयाबीनची मागणी तेजीत राहण्याची शक्यता असून दिवाळीनंतरही सोयाबीनचे मार्केट टाईट राहिल, असे जाणकार सांगतात.यावर्षी केंद्रसरकारने सोयाबीन, कापूस, चना याच्या हमीभावात वाढ केली आहे. याचा निश्चितपणे फायदा शेतकºयांना होणार आहे. कापसाचे हमीभाव ४ हजार २०० वरून ५ हजार ४५० करण्यात आले. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ करण्यात आले. शेतकऱ्यांना नाफेडला माल विकत यावा म्हणून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १ ते ३१ आॅक्टोबर या काळात सुरू आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य राज्य कृषीमूल्य आयोग.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितार्थ विविध निर्णय घेत असून मागील काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना येथे राबविली जात आहे. यंदा या योजनेचा शुभारंभ सोमवारी झाला. सुमारे ५ हजार पोते सोयाबीन शेतकरी शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून आमच्याकडे ठेवतील यासाठी आम्ही १० हजार पोते शेतमाल साठवणूक क्षमतेची दोन गोदाम सज्ज केले आहेत.- श्याम कार्लेकर, सभापती कृउबा समिती, वर्धा.