शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:05 IST

विविध मागण्यांसाठी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या रिमझीम पावसाची तमा न बाळगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देत बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले.

ठळक मुद्देभीम टायगर सेनेचे आंदोलन : गांधी पुतळ्यासमोर दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध मागण्यांसाठी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून शुक्रवारी भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या रिमझीम पावसाची तमा न बाळगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देत बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले.दिल्ली येथील जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. सनातन संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी. झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. जिल्ह्यातील गरजुंना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. स्वच्छता अभियान अंतर्गत शौचालय योजना वर्धा जिल्ह्यात प्रशासनाद्वारे अर्धवट राबविण्यात आले असून त्याची पूर्तता करण्यात यावी. एससी, एसटी, एनटी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप हटपणाऱ्या संस्थाचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी २२ आॅगस्टपासून भीम टायगर सेनेच्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर आंदोलनाला सहा दिवसांचा कालावधी लोटूनही मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल उचलल्या जात नसल्याचा आरोप करीत आज भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देऊन बुरा मत ‘देखो-कहो-सुनो’ आंदोलन केले. या आंदोलनात भीम टायगर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पवनार येथे रास्तारोकोपवनार : संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागण्यासाठी आज भीम टायगर सेनेच्यावतीने वर्धा-नागपूर महामार्गावर पवनार येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व भीम टायगर सेनेचे तालुका उपप्रमुख विशाल नगराळे यांनी केले. भीम टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धातास रास्तारोको आंदोलन केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात रवींद्र चाटे, नीरज नगराळे, अनुप नगराळे, नितीन कवाडे, जीवन चाटे, अश्विनी कवाडे, सागर वैद्य, विक्रम वैद्य, उमेश नगराळे, अक्षय पाटील, रंजित नगराळे, पूनम नगराळे, सुनंदा जिंदे, सविता नगराळे, वैभव निखाडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप