शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७.४० लाख वृक्ष लागणार

By admin | Updated: July 1, 2016 02:04 IST

राज्यात २ कोटी वृक्षलावगड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी ७ लाख ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वृक्ष लागवड कार्यक्रम : वनविभाग लावणार ५ लाख वृक्ष वर्धा : राज्यात २ कोटी वृक्षलावगड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी ७ लाख ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उद्देश यशस्वी करण्याकरिता एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना शासनाकडून राबविण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. वृक्षारोपण मोहिमेत वनविभाग, सामाजिक वनीकरण, महसूल व इतर सर्व विभाग प्रमुख, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, निसर्ग सेवा समिती आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून मोहीम यशस्वी करण्यात येणार असून एक व्यक्ती एक वृक्ष ही संकल्पना साकार करण्यासाठी जनतेने यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षरोपणासाठी वृक्ष उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी सांगितले.शुक्रवारी वृक्ष लागवड करण्याबाबतचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत वन विभागास जंगलक्षेत्रातील ५८ रोपवनस्थळी एकूण ४ लाख ९९ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाला २० हजार व शासनाच्या इतर २० विभागांतर्गत असलेल्या यंत्रणांना २ लाख २० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभागाकडे इतर विभाग व यंत्रणासाठी वर्धा परिक्षेत्र गांधी रोपवाटिका, वर्धा, हिंंगणी वनपरिक्षेत्र हिंगणी रोपवाटिका, समुद्रपूर वनपरिक्षेत्र मोहगाव रोपवाटिका, आष्टी वनपरिक्षेत्र पिलापूर रोपवाटिका, तळेगाव वनपरिक्षेत्र जसापूर, रोपवाटिका व कारंजा परिक्षेत्र, खरांगणा रोपवाटीकेत रोप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या रोप वाटिकेत करंज, पेल्टोफोरम, गुलमोहर, शिशु, कॅशिया, आवळा, सिताफळ, महारूखा, पापडा, बेहडा, खैर, अंजन, अमलतास, साग, कडूनिंब इत्यादी जातीचे रोपे उपलब्ध आहे.वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच इतर सर्व यंत्रणेचे अधिकारी यांनी नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुक्याकरिता एक तालुका समन्वयक लागवड अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा समन्वयक म्हणून सामाजिक वनिकरणचे उपसंचालक आहे. तालुका समन्वयक लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी आणि कारंजा आहेत.वृक्ष लागवड मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभाग व्हावा या दृष्टीने वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रोपे लागवड कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधी, संस्थाचे पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी, सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक इच्छुक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. या मोहिमेत कुठलीही अडचण आल्यास उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार व उपसंचालक, सामाजिक वनीकरण एस.टी. साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपवनसंरक्षक दिगांबर पगार यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होणार वृक्ष लागवड- राज्यात २ कोटी वृक्ष लागवड केली जाणार असून जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड केली जाणार आहे.-देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथे खासदार रामदास तडस, हिंगणघाट तालुक्यातील धर्मापूर व समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे आमदार समीर कुणावार, सेलू तालुक्यातील रायपूर येथे आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धा तालुक्यातील आंजी जवळील पवनूर, भूगाव व तरोडा येथे आमदार रणजीत कांबळे, आर्वी तालुक्यातील सारंगपुरी व बायोडयाव्ह सिटी पार्क तळेगाव येथे आमदार अमर काळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड केली जाणार आहे.-जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुद्धा १ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात त्यांच्याच निवासस्थानापासून करणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० वाजता सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामात सूटराज्यातील २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामावर येण्यासाठी दुपारी १ वाजता पर्यंत सूट देण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी जेथे वृक्ष लागवड केली त्या ठिकाणचे वृक्ष लागवड करून सहभाग घेतल्याचे छायाचित्र कार्यालयाला सादर करावे लागेल. ही सूट केवळ वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाकरिताच असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.