शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हा जनजाती संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:19 IST

विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्ह्याच्यावतीने माहेश्वरी भवन येथे जनजाती संमेलन पार पडले. उद्घाटन सत्रात वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री संजय कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

ठळक मुद्दे विदर्भ वनवासी कल्याण आश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ वनवासी कल्याण आश्रम जिल्ह्याच्यावतीने माहेश्वरी भवन येथे जनजाती संमेलन पार पडले. उद्घाटन सत्रात वनवासी कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री संजय कुलकर्णी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे जिल्हाध्यक्ष महेश बुधवानी, आयोजन समितीचे अध्यक्ष शरद आडे, संयोजक लक्ष्मण मरसकोल्हे उपस्थित होते.वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने संपूर्ण देशामध्ये १९५२ पासून वसतिगृहाच्या माध्यमातून आदिवासी समाजात शिक्षणाचे महत्त्व पोहचविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. आदिवासी समाजाने आल्या रूढी परंपरा जोपासल्या आहेत, असे संजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी संजय कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रास्ताविक धनंजय बल्लाळ यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रकाश देशपांडे यांनी मानले.वनवासी कल्याण आश्रम देशातील दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या शेवटच्या आदिवासी समाजासाठी कार्य करीत असल्याची माहिती संघटनमंत्री विनायक सुरतने यांनी दिली. आपसातील सर्व मतभेद विसरून सर्व जनजाती समाजाने एका मंचावर येऊन समाजाच्या हितासाठी कार्य करावे, असे सत्राचे अध्यक्ष विदर्भ वनवासी कल्याण आश्रमचे प्रांत अध्यक्ष विनायक ईरपाते म्हणाले.याप्रसंगी समाजातील उच्च शिक्षण घेत समाजकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात डॉ. पुरूषोत्तम प्रत्येके, डॉ. दीपश्री प्रत्येके, मिनाखी सुरपन, विजय उईके, रूख्मिनी मसराम, सलाम यांचा समावेश होता. संचालन प्रा. प्रफुल बनसोड यांनी केले तर आभार जावडेकर यांनी मानले. आयोजनाकरिता सर्वांनी सहकार्य केले.