शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुसुंदच्या ग्रामस्थांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:10 IST

सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनच्या नेतृत्वात मोर्चा काढून रेटली पुनर्वसनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सुसुंद या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात पोस्ट आॅफिस चौक येथून जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.सुसुंद गावाला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात वाघ, अस्वल, बिबट, रोही आदी वन्य प्राणी आहेत. यात वनविभागाकडून मिळणारी मदत तोकडीच आहे. दरम्यान, आमगाव (ज.) येथील घटनेनंतर पोलीस, वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता. यावेळी ग्रामस्थांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सुसुंद या गावातील नागरिकांना सध्या दहशतीच्या वातावरणात जगावे लागत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.स्थानिक पोस्ट आॅफिस चौक येथून काढण्यात आलेला मोर्चा सुरुवातीला पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविला; परंतु, यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी पोलिसांना एवढ्या उन्हात आम्ही येथे कसे थांबणार, असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जावू देण्याची विनंती केली. त्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी संमती दर्शविल्याने मोर्चा जिल्हाकचेरीपर्यंत पोहोचला. याप्रसंगी पुन्हा एकदा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समीर गिरी यांनी केले. मोर्चात युवा परिवर्तनच्या सदस्यांसह गावकरी सहभागी झाले होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्याजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी पोलिसांनी मोजक्याच व्यक्तींना दालनात सोडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चेदरम्यान इतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.पोलीस आंदोलकात शाब्दीक चकमकपुनर्वसनच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले. संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी न जाता केवळ पाच जणांनीच जावे असे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यावर निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात कमीत कमी दहा व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयात जावू द्यावे, अशी विनंती याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली. या मुद्दावर आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती.

टॅग्स :Morchaमोर्चा