शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ गावांना पुरस्कार : गावकऱ्यांच्या श्रमदानाने झाली जलक्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा -३, २०१८ मध्ये जिल्ह्यात ९६ वर अधिक गावे सहभागी झाले होते. त्यानंतर काही गावांनी माघार घेतली. परंतु अनेक गावांनी ४५ दिवस श्रमदान करून आपले गाव पाणीदार बनविण्याचा वसा उचलला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आर्वी तालुक्यातील पिंपळधरीबाई या गावाला तालुका स्तरावरचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार बोदड तर तृतीय पुरस्कार हिवरा गावाला देण्यात येणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील लिंगा मंडवी ला प्रथम, किन्हाळ्याला द्वितीय तर नांदोरा या गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सेलू तालुक्यात खडका गावाला प्रथम, गायमुखला द्वितीय तर पिंपळगावला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. देवळी तालुक्यात तळणी (भागवत) ला प्रथम, फत्तेपुरला द्वितीय तर कविटगावला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुणे येथे रविवारी पार पडला. या जिल्ह्यातील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही.अनेकांचे हात लागले श्रमदानातगावकºयांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक गावात जाऊन श्रमदान करून नागरिकांचा उत्साह वाढविला.