शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर 89.5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

१८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देमृत्यूदर २.५३ च्या घरात : ९० दिवसांनी रुग्ण संख्या होते दुप्पट, दररोज पडतेय रुग्णांची भर

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवठड्यात जिल्ह्यात कोरोनाने उच्चांकी गाठण्याचा प्रयत्न केला. याच काळात भविष्यातील धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३६ तासांसाठी सक्तीची संचारबंदी लागू केली होती. याच संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकांनी सार्वजनिक स्थळ निर्जंतुक केली. असे असले तरी सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर ८९.५ च्या घरात असून ९० दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पुन्हा लॉकडाऊन काय ही भीती कायम असतानाच २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल ४५ नवीन कोविड बाधित सापडल्याने लस आली; पण कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याची जाण अनेकांना झाली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनायनात प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. 

रिकव्हरी दर पोहोचला ९२.५७ टक्क्यांवरवर्धा जिल्ह्यात सध्या ९० दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. असे असले तरी जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९२.५७ इतका असल्याचे सांगण्यात आले.

सध्या जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ९० दिवसांनी दुप्पट होत आहे. शिवाय जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून पहिल्या फळीतील कोविड योद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. असे असले तरी अजूनही वर्धा जिल्ह्यावरील कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वर्धेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच.- डॉ. प्रभाकर नाईक,                                              

 अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या