शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धच असल्याचे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे वयाची साठी पार केलेल्यांनी सध्या अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवर्ध्यात कोविडची दुसरी लाट : डेथ ऑडिटमुळे उलगडले वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये थैमान घातल्यानंतर आता कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात थैमान घालू पाहत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविड मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धच असल्याचे आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या डेथ ऑडिटमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे वयाची साठी पार केलेल्यांनी सध्या अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस आरोग्य विभागाने जिल्ह्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट केले. या ऑडिटमध्ये सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड युनिटमध्ये मृत्यू झालेल्या १६५, तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील काेविड युनिटमध्ये मृत्यू झालेल्या २२० मृत कोविडबाधितांच्या मृत्यूची कारणमीमांसा करण्यात आली. शिवाय, मृत व्यक्ती कुठल्या वयोगटांतील होती, याबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यात आली. या डेथ ऑडिटदरम्यान आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील १६५ कोविड मृतांपैकी २० ते ४० वयोगटांतील आठ, ४१ ते ६० वयोगटांतील ४५, तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या ११२ व्यक्ती असल्याचे पुढे आले. तसेच कस्तुरबा रुग्णालयातील २२० कोविड मृतांपैकी २० ते ४० वयोगटांतील ११, ४१ ते ६० वयोगटांतील ६५, तर ६० पेक्षा जास्त वय असलेल्या १४४ व्यक्ती असल्याचे पुढे आले असून तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. 

व्हॅक्सिन ठरतेय सुरक्षा कवच ४५ ते ६० आणि ६० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना सध्या कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जाणारी व्हॅक्सिन ही उपयुक्त असून ती सुरक्षाकवचासारखीच काम करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोना संकटात प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे तसेच प्रत्येक लाभार्थ्याने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू