लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून धूम्रपान थांबविण्याकरिता विविध प्रकारे जनजागृती करण्याकरिता वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. तरीही जिल्ह्यात २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत तब्बल १८७ नागरिकांनी आपली जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तसेच हृदयविकार तसेच लकवा मारलेल्या रुग्णांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्यात एक हजार ८०५ नागरिकांना अर्धांगवायू आणि हृदयविकाराने ग्रासले आहे.तंबाखूचे सेवन तसेच धूम्रपानावर बंदीकरिता शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तालुकास्तरावर विविध माध्यमातून याबाबत जागर करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर धूम्रपानाचे परिणामही नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहे. तरीही जिल्ह्यातील हे वास्तव धक्कादायक आहे. महिलांमध्येही तंबाखू खाण्याचे प्रमाण अधिक असून २०१२ ते २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ७४ महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती आहे. विशेषत: सिगारेट पिण्यामुळे यकृत निकामी होते. जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० वयोगटातील नागरिकांना ग्रासले आहे. २०१२ ते १९ मध्ये गर्भाशयाच्या आजाराची रुग्णसंख्या वाढली आहे. तंबाखू आणि खर्रा खणाऱ्यांना मुख कर्करोगाचे २०१२ ते २०१९ पर्यंत ११ नागरिक कर्करोगाने ग्रस्त आहेत. तंबाखू सेवन, धूम्रपान रोखण्याकरिता जनजागृती करण्यात येत आहे.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूचशासनाने सार्वजनिकस्थळी तसेच शासकीय कार्यालय परिसरात धूम्रपानास सक्त मनाई केली आहे. मात्र, शहरात सार्वजनिक ठिकाणी सर्रास नागरिक धूम्रपान करताना दिसून येत आहेत. यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच अनेक महाविद्यालयीन तरूण शौक म्हणून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करीत असल्याचे दिसून येत आहे. पानठेल्यामागे, मैदानात जात शाळकरी विद्यार्थीही धूम्रपान करीत असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात १ हजार ८०५ नागरिक अर्धांगवायूने पीडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:27 IST
शासनाकडून धूम्रपान थांबविण्याकरिता विविध प्रकारे जनजागृती करण्याकरिता वर्षाकाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. तरीही जिल्ह्यात २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत तब्बल १८७ नागरिकांनी आपली जीव गमावल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
जिल्ह्यात १ हजार ८०५ नागरिक अर्धांगवायूने पीडित
ठळक मुद्देधूम्रपानाचा परिणाम। १८७ जणांनी गमावला जीव