शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पिंपळझरीच्या नुकसानग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:31 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

ठळक मुद्देबेघरांना मिळणार घरकूल योजनेतून घर : शेतशिवाराची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकूल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले.मार्च अखेरपर्यंत सर्व पीडित कुटुंबियांना पक्की घरे बांधून देण्याचे आदेश तहसीलदार, नायब तहसीलदार, आर्वी उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांसमोर दिले. तसेच शेतीच्या नुकसानीचे देखील त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याच दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रोहणा येथील अविनाश कहाते यांच्या नुकसानग्रस्त शेताला भेट दिली. कहाते यांना प्रगत व तांत्रिक शेतीसाठी स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शासनाने प्रदान केला आहे. त्यांची पिंपळझरी नजीक २२ एकर शेती असून त्या शेतीत शेडनेट व ठिबक सिंचनाची सोय केली आहे. तिखट मिरची, सिमला मिरची, कोबी, हरभरा, कापूस व हळदीचे पीक होते. हळद जमिनीत असल्याने ते पीक सोडून इतर सर्व पिके जमीनदोस्त झालीआहे. शिवाय शेडनेट देखील नेस्तनाबुत झाले. नैसर्गिक आपत्तीत कहाते यांचे २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीत वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर, सरपंच चंदा दौलत कुंडी, संजय बोंदरे, मयूर बुरघाटे, शेतकरी अविनाश कहाते यांच्यासह गावकऱ्यांनी समस्या मांडल्या.संकटाचा सामना करण्यासाठी दिले भावनिक बळपिंपळझरी गावाला गारपिटीचा आणि वादळाचा चांगलाच तडाखा बसला. येथील बहुतांश नागरिक बेघर झाले. लोकप्रतिनिधी तसेच शासकीय स्तरावर अधिकारी वर्गाने गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच त्यांना लागणारी मदत तात्काळ पुरविली.पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकुल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पीडितांना मदतीचे आश्वासन देवून भावनिक बळ दिले.