शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयएसओ शाळेच्या भेटीत जिल्हाधिकारी अवाक्

By admin | Updated: August 13, 2016 00:48 IST

सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे मराठी माध्यमांची मुले इंग्रजी या विषयाचा न्यूनगंड बाळगतात.

विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक : मॉडेल शाळा बनविण्याचा मानस वर्धा : सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे मराठी माध्यमांची मुले इंग्रजी या विषयाचा न्यूनगंड बाळगतात. पण हे विधान खोटे ठरवित वर्धा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या हावरे ले आऊट, सेवाग्राम येथील आय. एस. ओ. दर्जा प्राप्त जि. प. शाळेतील विद्यार्थी भविष्याचा वेध घेत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी नवाल यांनी सदर शाळेला भेट दिल्यावर तेही अवाक झाले. हीच ती मॉडेल शाळा जी मला अपेक्षित होती. असे गौरवोद्गार त्यांनी या भेटीत काढले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक के. झेड. शेंडे, डायटचे प्राचार्य देशमुख, धांदे, गटशिक्षणाधिकारी कोडापे, संगीता महाकाळकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी वर्ग २ ते ४ च्या विद्यार्थ्यांकडून बेरीज व गुणाकार या क्रियेवर उदाहरणे सोडवून घेतली. काही इंग्रजीचे प्रश्न विचारले. उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आदित्य यादव या तिसरीच्या विद्यार्थ्यांला स्वत:चा पेनही बक्षीस म्हणून दिला. मुळाक्षरांची बाग, नयनरम्य परिसर, विद्यार्थी वा शिक्षकांनी परिश्रमाने फुलविलेली पसरबाग, बागेत असलेले विविध प्राणी, ज्ञानरचनावादी वर्गरचना, आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य याचा वापर येथील विद्यार्थी अध्ययनात करतात. या शाळेत समर्पित भावनेने काम करणारे सुनिता नगराळे आणि प्रकाश कांबळे या शिक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. आय.एस.ओ. नामांकन मिळाल्याबाबत सर्वांचे अभिनंदनही करण्यात आले. ही शाळा जिल्ह्याची मॉडेल शाळा ठरवू असेही डायटच्या प्राचार्यांना यावेळी सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी) प्रॅक्टिकल शिक्षणावर भर पुस्तकी ज्ञानाने मुले केवळ शिकतात परंतु ते परिपक्व होत नाही. व्यावहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना घडविणारे असते. त्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सर्वांगिण विकासासाठी आवश्यक ज्ञान देण्याचा खटाटोप शिक्षक करीत आहेत. म्हणूनच शाळेला भेट दिल्यावर विद्यार्थ्यांची प्रगती पाहून जिल्हाधिकारीही अवाक झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही कौतुकाची थाप दिली.