शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटला मिळाले जिल्हा व सत्र न्यायालय

By admin | Updated: February 6, 2017 01:04 IST

शहरात जिल्हा व सत्र न्यायालय येत्या ३ एप्रिलपर्यंत सुरू करण्यात यावे असे आदेश, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी गुरुवारी पारित केला.

 न्यायालयाचे आदेश : अधिवक्ता संघाची २० वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास हिंगणघाट : शहरात जिल्हा व सत्र न्यायालय येत्या ३ एप्रिलपर्यंत सुरू करण्यात यावे असे आदेश, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी गुरुवारी पारित केला. न्यायालयीन लढाई नंतर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करावे याकरिता येथील अधिवक्ता संघाकडून गत २० वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु दरवेळी येणाऱ्या अडचणीमुळे त्यांची मागणी अपूर्ण राहत होती. यामुळे येथील अधिवक्ता संघाने २०१६ ला नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती. सदर न्यायालय हिंगणघाट शहरात सुरु व्हावे म्हणून अधिवक्ता संघाने १९८४ पासून लढा सुरु केला होता. यापूर्वी या मागणीकरिता अधिवक्ता संघाने साखळी उपोषणही केले. विविध माध्यमातून निवेदन देऊन या मागणीचे गांभीर्य शासनाच्या विधी विभागाच्या नजरेत आणून दिले; परंतु लालफितशाही कारभारामुळे हे न्यायालय येण्यास विलंब झाला. हिंगणघाट आणि समुद्रपूर येथील ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मागण्याकरिता वर्धेला हेलपाटे मारावे लागत होते. सामान्य माणसाला होणारा त्रास आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही कायद्याची भूमिका पाहून येथील अधिवक्ता संघाने सरळ न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानेही अधिवक्ता संघाची बाजू समजावून घेऊन हिंगणघाट शहरात जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेचा आदेश दिला. जिल्हा व सत्र न्यायालय शहरात यावे याकरिता आमदार समीर कुणावार हे सुरवातीपासून प्रयत्नरत होते. त्यांनी या न्यायालयाकरिता तहसील कार्यालयाची इमारत उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न केले. सदर न्यायालय शहरात आवश्यक असल्याचे लेखीपत्रही त्यांनी न्यायालयात दिले. या न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याकरिता निधी शासनपातळीवर मंजूर झालेला असून लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगणघाट येथे व्हावे याकरिता अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक काकडे, अ‍ॅड. अर्शी इक्बाल अहमद, अ‍ॅड. चंद्रकांत देशपांडे, अ‍ॅड. आर.एल. सुटे, अ‍ॅड. जवादे, अ‍ॅड. बोंडे, अ‍ॅड. वाशीमकर यांच्यासह जुन्या पिढीतील वकिलांनी केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)