शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी निवड समितीचा जिल्हा प्रशासनाला विसर

By admin | Updated: May 13, 2014 00:03 IST

शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात तसेच वस्ती-वाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू केले.

गौरव देशमुख - वायगाव (नि.)

शासनाने बालकांचे संगोपन व त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शहरासह ग्रामीण भागात तसेच वस्ती-वाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्र सुरू केले. या अंगणवाड्यांत येणार्‍या बालकांना योग्य सुविधा देण्याकरिता नेमल्या जाणार्‍या अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. ही भरती प्रक्रिया राबविण्याकरिता एक समिती गठित केली जाते. जिल्ह्यात मात्र गत दोन वर्षांपासून ही अंगणवाडी निवड समितीच गठित करण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार या अंगणवाडी समितीचे गठण करावयाचे असते. पालकमंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना कल्पना देऊन जिल्हाधिकार्‍यांच्या पुढाकाराने निवड समितीचे गठण करता येते. तसे करणे अनिवार्य आहे. या समितीचे गठण करण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली असली तरी समितीचे गठण झाले नाही. जाहिरात प्रसिद्ध केली, मग, समिती का गठित करण्यात आली नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे. समिती नसल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. अंगणवाडी सेविकांवर बालकांच्या आरोग्यासह गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यामुळे ही रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.