बोरधरण : ग्राम विकास परिसर समितीच्या उपक्रमातर्गंत ११५ महिलांना वापराकरिता गॅस सिलिंडरचे वितरण माळेगाव (ठेका) येथे सोमवारी करण्यात आले. माळेगाव हे गाव धुरमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच प्रभाकर घाटोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे, समितीचे अध्यक्ष राजू सेलतुमडे, समितीचे सचिव उमेश शिरपुकर, वनरक्षक बावणे, उदगीकर, सयाम आदिंची उपस्थिती होती. महिला वर्गाला स्वयंपाक तयार करण्यासाठी सरपणाचा वापर करावा लागु नये. सरपणाच्या वापरातून होणाऱ्या धुरापासून गाव मुक्त व्हावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सिलिंडर वितरणाची योजना घेण्यात आली. या योजनेंतर्गत सिलिंडरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)गाव धुरमुक्त करणे म्हणजे स्वयंपाकाकरिता लागणाऱ्या जळावू लाकडासाठी नागरिक जंगलातील वृक्षाची तोड करणार नाही. म्हणजे नैसर्गिक संतुलन समतोल राखण्यास मदत होईल. त्याकरिता जंगलाला लागून असलेली गावे धुरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी भिंगारे यांनी सांगितले.
११५ महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण
By admin | Updated: May 6, 2015 00:05 IST