शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

तालुक्यातील सहा मंडळस्तरावर पीककर्जाचे वाटप

By admin | Updated: May 28, 2016 02:11 IST

तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले.

बँकेच्या नियमांमुळे अनेक अडचणी : आयोजित मेळाव्यात बँक अधिकारी व कास्तकारांची उपस्थितीदेवळी : तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात नवीन पीककर्ज, पीककर्जाचे नूतनीकरण तसेच पीककर्जाच्या पुर्नगठनाबाबत विचारविनीमय होवून काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. देवळी येथील मेळाव्यात बँक विविध बँकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आयोजित मेळाव्यात १९ मे नंतर आजपावेतो देण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती देण्यात आली. देवळी येथे ३१० पीककर्जाची प्रकरणे निकाली काढून २ कोटी ८७ लाखांचे वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे ३३, पीककर्जाचे नूतनीकरण २७० तसेच पुनर्गठनाचे ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. गिरोली या मंडळस्तरावर ५८ प्रकरणे निकाली काढून ३६ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे आठ, पीककर्जाचे नूतनीकरण ४२ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे करण्यात आली. भिडी मंडळस्तरावर ५२ प्रकरणे निकाली काढून १८ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे दोन, तसेच पीककर्ज नुतनीकरणाची ५० प्रकरणे निकाली काढण्यात आली. पुलगाव मंडळस्तरावर नवीन प्रकरणे १२, पीककर्जाचे नुतनीकरण, ९६ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे निकाली काढून ९० लाखाचे पीककर्ज वाटण्यात आले. अशी माहिती तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. देवळी मंडळस्तरासाठी स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवारी आयोजित मेळाव्यात नवीन पीककर्जाची १० प्रकरणे तसेच पीककर्जाचे नुतनीकरण ४० व पुनर्गठनाचे सात प्रकरणे निकाली निघाली. मेळाव्याला उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी पांडे, तहसीदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार स्रेहल ढोके व बी.एस. भागवत तसेच मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)नियमांच्या आडकाठीने शेतकरी त्रस्त देवळी मंडळात मेळाव्यात पीककर्जाच्या आशेने आलेल्या कास्तकारांच्या अनेक प्रकरणात बँकेचे नियम अडचणीचे ठरले. त्यामुळे अनेक कास्तकार पीककर्जापासून वंचित राहिले. हिंगणघाट येथे उदासीनता जिल्हाभर असलेल्या या कर्ज मेळाव्याकडे हिंगणघाट मंडळातील शेतकऱ्यांकडून विशेष सहकार्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मंडळात शेतकऱ्यांकडून कर्जाकरिता केवळ बँकेत गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.