शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

३० जूनच्या आत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:13 IST

यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत कर्ज वाटप पूर्ण करावे, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.तहसील कार्यालयात पीक कर्ज वितरण आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एसडीओ समाधान शेंडगे उपस्थित होते. तिवारी यांनी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आरबीआयच्या नियमापेक्षा अधिक कागदपत्रे मागून शेतकऱ्यांना त्रास देतात. याबाबत बँक अधिकाऱ्यांना खडसावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी बँक अधिकाऱ्यांना आरबीआयचे नियम सांगितले. नियमाप्रमाणे एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी केवळ सातबारा, ८- अ आणि ६ क एवढेच कागदपत्र घेण्यात यावी, असे निर्देश आहेत. मूल्यांकन, चतु:सीमा यासारखे कागदपत्र मागू नयेत, असे सांगितले. शेतकºयांना सुलभ कर्ज वाटप करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सहायक निबंधक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे, अशा सूचना तिवारी यांनी दिल्या. कर्जमाफीची रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसन्याबाबत आ. कुणावार यांनी बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली. कर्जमाफीची रक्कम अद्याम जमा न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम ३० जूनपर्यंत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला अनुपस्थित असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. तूर आणि हरभरा खरेदीबाबत शासनाकडे बैठक लावावी. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर व हरभरा पडून असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक शाखेत तथा ग्रा.पं. मध्ये लावावी, असे ते म्हणाले.बोंडअळीचे पैसे हे योजनेचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळते करू नये. कर्ज खात्यात वळते केल्याचे आढळल्यास सरकारी निधीचा गैरवापर प्रकरणी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नवाल यांनी दिला. ठिबक सिंचन संचाचा बॅकलॉग यंदा पूर्ण केला. यासाठी ११.५० कोटी रुपये दिले असून यांत्रिकीकरणासाठी निधी दिल्याचे नवाल यांनी सांगितले.बैठकीला पं.स. सभापती, लीड बँक मॅनेजर वामन कोहाड, सहा. निबंधक तलमले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.