शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजक सौंदर्यीकरणाचेच विद्रुपीकरण

By admin | Updated: March 12, 2015 01:36 IST

शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली.

वर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकाचे सौदर्यीकरण करण्याची योजना तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात आखण्यात आली. याचे ‘रोल मॉडेल’ सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आले. सिमेंटचे आकर्षक टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच जाहिराती लावण्याचीही सोय करण्यात आली. परंतु सध्या यातील बरीच झाडे वाळून केवळ माती उरली आहे. त्यामुळे हे सौंदर्यीकरणच शहरासाठी विद्रुपीकरण ठरत आहे. सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांच्या सहकार्याने इतर चौकात नंतर असेच सौंदर्यीकरण केले जाणार होते. परंतु नवनिर्वाचित नगराध्यक्ष याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या दुभाजकाची स्थिती अधीकच वाईट झाली आहे. शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर छोटे छोटे चौक असून दोन्ही बाजूला असलेल्या मार्केटमध्ये जाणे सोयीस्कर होते. मुख्य मार्ग असल्याने तो आकर्षक आणि हिरवळीचा असावा अशी शहरवासीयांची स्वाभाविक इच्छा आहे. यासाठी म्हणून काही वर्षापूर्वी दुभाजकांवर लोखंडी कठडे बसवून झाडे लावण्यात आली. पण यातील झाडांकडे लक्ष न दिल्याने दुभाजकांवर रान तयार झाले. तसेच कठडेही अपघातांमुळे तुटून बाहेरच्या बाजूला वाकले. त्यामुळे अपघातही वाढले. मोठ्या झाडांच्या सावलीत मोकाट जनावरे बसण्याचा प्रकार सुरू झाला. आजही हा प्रकार सुरू आहे. या सर्व बाबींना आळा बसावा यासाठी म्हणून नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या कार्यकाळात दुभाजक सौदर्यीकरणाचे एक नये रोल मॉडेल तयार करण्यात आले. याचा डेमो सोशालिस्ट चौकात तयार करण्यात आला. दुभाजकांवर त्रिकोणी आकाराचे सिमेंटचे टाके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. तसेच त्यावर छोटे बॅनर लावण्याची सोयही करण्यात आली. नगर परिषदेच्या योजना तिथे बॅनरच्या सहाय्याने लावण्यात आल्या. पुढे जाऊन असेच सौदर्यीकरण इतरही चौकातील दुभाजकांवर सामाजिक संस्था आणि इतर व्यावसायिकांच्या मदतीने करण्याचा मानस होता. येथे आपल्या जाहिराती लावण्याची मुभा देण्यात येणार होती. पालिकेचे उत्पन्न वाढावे हा यामागील मानस होता. पण सध्या या सौदर्यीकरणाचेच तीनतेरा वाजले आहे.सध्या या टाक्यांमधील बरीच झाडे वाळली असून त्यात केवळ माती उरली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरातील कागदाचा कचरा, प्लास्टिक पाणी पाऊच, खर्रा पन्नी, गुटखा पुड्या अशा प्रकारचा कचरा या कुंड्यांमध्ये आढळून येतो. नवे नगराध्यक्ष याकडे लक्षच द्यायला तयार नसल्याने विदृपीकरण वाढत आहेत. यामुळे दुभाजक सौंदर्यीकरणाचे ‘रोल मॉडेल’ केवळ ‘मॉडेल’ पुरतेच उरल्याचा प्रत्यय येत आहे.(शहर प्रतिनिधी)