शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धंतोलीतील हॉटेल शिव मध्ये अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:37 IST

निक धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव मध्ये अस्वच्छतेचा चांगलाच कळस असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपालिकेच्या कारवाईत उघड : विशेष पथकाकडून पाच हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव मध्ये अस्वच्छतेचा चांगलाच कळस असल्याचे दिसून आले. या हॉटेलात उघड्यावर अन्नासह सर्वत्र शिळे अन्न उघड्यावर असल्याचे दिसून आले. यामुळे पालिकेच्या पथकाने या हॉटेल मालकांना खडसावत हॉटेलात स्वच्छता राखण्याची तंबी दिली. ही कारवाईची पहिली वेळ असल्याने केवळ ५ हजार रुपयांचा दंड ठोठावून पुढे अशी हयगय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना हॉटेल व्यावसायिक किशोर धांदे याला केल्या.स्थानिक धंतोली भागातील हॉटेल शिव येथे शहरातील नागरिक गरम अल्पोहाराकरिता येतात. येथे सकाळच्या वेळी चांगलीच गर्दी असते. मात्र हॉटेलातील अस्वच्छतेबाबत ग्राहक नाराज होते. याची माहिती कुण्या जागरूक नागरिकाने पालिकेला दिली. यावरून पालिकेच्या विशेष पथकाने आज सायंकाळी या हॉटेलात धाड घातली. या धाडीत हॉटेलातील अस्वचछता पाहून पथकातील अधिकारी आणि कर्मचारी अवाक् झाले. या संदर्भात हॉटेल मालकाला विचारणा केली असता त्याच्याकडून चालढकलीचे उत्तर मिळाले. यामुळे हॉटेलमालक नागरिकांच्या आरोग्याबाबत सजग नसल्याचे दिसले.यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत हॉटेलमध्ये स्वच्छतेबाबत कुठल्याही उपाययोजना नसल्याचे दिसून आले. सर्व खाद्यपदार्थ उघड्यावरच तयार केल्या जात असल्याचे कारवाई दरम्यान पुढे आले. यामुळे पालिका कर्मचाºयांनी सदर हॉटेलच्या मालकाला दंड ठोठावला. सदर व्यावसायिकाकडे न.प.चे नाहरकत प्रमाणपत्रही नसल्याचे दिसून आले. शिवाय हॉटेलमधील उरलेले अन्न सदर व्यावसायिक थेट नालीमध्ये टाकत असल्याचे आढळून आले. हॉटेलच्या परिसरात असलेली अस्वच्छता व त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत पथकाच्यावतीने दंडात्मक कारवाई केली.ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, नवीन गोन्नाडे, गुरूदेव हटवार, लंकेश गोडेकर, सतीश पडोळे यांनी केली.अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्षशहरातील नामांकित असलेल्या हॉटेलात अन्न व औषधी औषधी प्रशासनाच्या अधिकाºयांनी कधी चौकशी केली नाही. पालिकेच्या चौकशीत येथील अस्वच्छतेचा प्रकार उघड झाला. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागाने येथे कार्यवाही करणे गरजेची असल्याचे नागरिक यावेळी बोलताना दिसले.धंतोली चौकातील हॉटेल शिवमध्ये अस्वच्छतेचा कळस दिसून आला. येथील कारागिर अस्वचछ कपड्यात होते. शिवाय पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कारवाई केली.- अशोक ठाकूर, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, वर्धा.