शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

मास्टर कॉलनी, गौरी नगरातील प्रकार : पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून वर्धा : शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, परिसरात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेकदा जीवन प्राधिकरण व ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वर्धा ते यवतमाळ मार्गावर असलेल्या व सावंगी (मेघे) ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरी नगर परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. किमान पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा असते; पण गत काही दिवसांपासून या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मास्टर कॉलनीमध्ये असलेली पाईपलाईन अनेक दिवसांपूर्वी फुटली होती. याबाबत नागरिकांनी जीवन प्राधिकरण तसेच सावंगी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना पावसाळ्यात गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. मॉस्टर कॉलनीमध्ये फुटलेली पाईपलाईन सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये असल्याने अक्षरश: नालीतील सांडपाणीच नळाद्वारे नागरिकांना पुरविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात अनेक आजारांचा फैलाव होत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय या भागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यातही ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरत आहे. या भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) ‘त्या’ घरातील महिलेचे दोन महिन्यांसाठी मुलीकडे वास्तव्य ४वर्धा ते यवतमाळ मार्गाला लागूनच साधू नगराळे यांचे घर आहे. या घरात त्यांच्या पत्नीच वास्तव्य करतात. घराच्या आजूबाजूला असलेले रस्ते आणि नाल्यांची उंची अधिक झाल्याने पावसाचे तसेच सांडपाणी या घरामध्ये शिरते. परिणामी, या महिलेला पावसाळ्याचे दोन महिने आपल्या मुलीकडे राहायला जावे लागते. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलीत; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पावसाचे पाणी थेट घरात शिरत असल्याने तेथे राहणेच कठीण झाले आहे. शिवाय सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका राहत असल्याने एकटी महिला त्या घरात राहणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.