शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकतंत्र आणि महात्मा’ व ‘मिटती खेती उजडता किसान’वर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:29 IST

येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देसर्वोदयींचे तीन दिवसीय संमेलन : देशभरातून चार हजार गांधी विचारवंत होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. शिवाय या संमेलनात ‘लोकतंत्र आणि महात्मा’ तसेच ’मिटती खेती उजडता किसान’ या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती संमेलन संयोजक आदित्य पटनायक यांनी दिली.पटनायक म्हणाले २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने या संमेलनाचे महत्त्व काही वेगळे आहे. संमेलनाचे प्रमुख आयोजक सर्वोदय समाज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ आहेत. देश व जगात आज सत्य, प्रेम, करूणा, बंधुभाव यावर चालण्याचा मार्ग गांधी विचारातून जातो. त्यामुळे संमेलनाचा विषय वैश्विक आव्हाने व गांधीवादी विकल्प हा ठेवला आहे. समस्येचा विचार करता समाधान गांधी विचार व कार्यातूनच दिसते. त्यामुळे गांधी विचार मानणाºयांची संख्या वाढली. गांधी जयंती जगात यादगार ठरावी याची ही पूर्व तयारी समजायला हरकत नाही. संमेलनात सहभागींची संख्या जास्त असल्याने व्यवस्थेची तयारी जोरात असल्याचे आदित्य भाई यांनी सांगितले. आश्रम परिसरात भव्य सभा मंडप, निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्थानिक, वर्धा आणि विद्यापीठातील स्वयंसेवक यासाठी मदत करणार आहे.२३ फेबु्रवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली, गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व आयोजक समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात मेधा पाटकर विचार व्यक्त करणार असल्याची माहिती आदित्य पटनायक यांनी बोलताना दिली.सेवाग्राम येथे होणाऱ्या या संमेलनात देशभरातील गांधी विचारवंत सहभागी होणार आहे. या विचारवंतांना चर्चेदरम्यान कुठलीही अडचण जाणवणार नाही याची खबरदारी घेण्याकरिता आयोजन समितीकडून पूरेपुर तयारी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.