शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची वयोमर्यादा वाढविण्यावरून आरोग्य विभागात मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 13:49 IST

ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन ६० वयोमर्यादा निश्चित केली. यात आणखी ५ वर्षांची वाढ करण्यासाठी राज्यातील आरोग्यसेवेतील बड्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहे.

ठळक मुद्दे६५ वयोमर्यादेचा वरिष्ठांंनाच होणार लाभ डॉक्टरांची नाराजी, शासनावर वाढविणार दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात प्रत्यक्ष ग्रामीण भागत काम करणाऱ्या डॉक्टरांची प्रचंड टंचाई आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत शासनाने निर्णय घेऊन ६० वयोमर्यादा निश्चित केली. यात आणखी ५ वर्षांची वाढ करण्यासाठी राज्यातील आरोग्यसेवेतील बड्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहे. मात्र, याबाबत आरोग्य विभागातच मतभेद असल्याचे दिसून येत आहे.राज्यात आदिवासीबहुल भागात बालमृत्यू, कुपोषण, महिला मृत्यू आदींचे प्रमाण मोठे आहे. या भागामध्ये शासनाच्या आरोग्यसेवेशिवाय दुसरी यंत्रणा नाही. त्यामुळे याच आरोग्यसेवेवर नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. ग्रामीण भागात डॉक्टर जाण्यासच तयार होत नाहीत. त्यामुळे जवळपास ४० ते ४५ टक्के पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना ५ वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. डॉक्टरांची सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० करण्यात आली. मात्र, आरोग्यसेवेत संचालक पदापासून ते जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वयोमर्यादेत आणखी मुदतवाढ हवी आहे. सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यासाठी त्यांनी शासनावर दबाव वाढविला आहे. वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष आरोग्य सेवेशी फारच कमी सबंध येतो. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा वाढवून उपयोग होणार नाही, असा मतप्रवाह प्रत्यक्ष आरोग्यसेवेत ग्रामीण भागात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे डॉक्टरांना आकर्र्षित करण्यासाठी आरोग्य विभागातील सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेचा पॅटर्न नव्याने तयार करण्याची गरज आहे, असेही मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.मलाईच्या जागांवर आहे अधिकारीज्या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६५ हवी आहे, ते सारे अधिकारी मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणेतील मलाईच्या जागेवर बसले आहेत. त्यांच्याकडे प्रशासकीय काम असल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष आरोग्य यंत्रणेशी संबंध येत नाही. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा वाढविण्यालाही विरोध होत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेनेही आक्षेप नोंदविले आहेत, अशी माहिती आहे.

टॅग्स :Governmentसरकार