शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा कृउबाच्या संचालकांनी केला राज्यातील सात बाजार समित्यांचा दौरा

By admin | Updated: January 12, 2017 00:37 IST

स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन

नवीन भाजीबाजारामुळे शेतकऱ्यांना मिळणार प्राथमिक सुविधा वर्धा : स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राज्यातील सात कृषि उत्पन्न बाजार समितींना नुकतीच भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. सातही कृषि उत्पन्न बाजार समितींमधील सकारात्मक बदल व शेतकरी हितार्थ घेण्यात आलेले निर्णय यावेळी संचालकांनी जाणून घेतले. वर्धेत अत्याधूनिक असा वर्धेत नवीन भाजीबाजार तयार करण्यात येणार आहे. भेट देण्यात आलेल्या कृउबांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधेचे येथे अनुकरण करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन भाजीबाजारामुळे चांगल्या प्रतीच्या प्राथमिक सुविधा लवकरच मिळणार आहे. वर्धा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी नगर, बारामती, जळोची (उपबाजार), इंदापूर, फलटन, राजगुरुनगर (खेड), चाकण (उपबाजार) या ठिकाणी भेट देऊन येथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संचालकांनी अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या भाजीबाजार, धान्य बाजार, गुरांचा बाजार, शितगृहे, प्रक्रिया केंद्रे आदींचीही माहिती जाणून घेतली. यावेळी संचालकांनी त्या-त्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालकांशी विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी अडत खरेदीदाराकडे गेल्यावर बाजार समितीच्या व्यवहारावर काय परिणाम झाला तसेच भाजीबाजार नियमन मुक्तीबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सदर उपक्रमात वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर, संचालक विजय बंडेवार, अरविंद भुसारी, प्रकाश पाटील, दत्ता महाजन, शरद झोड, मुकेश अळसपुरे, भुषण झाडे, दिनेश गायकवाड, गंगाधर डाखोळे, सुरेशसिंग मेहेर, शामल मरोठी, सचिव समीर पेंडके आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी) दोन कृउबाचे अवलोकन करून तयार होईल नवीन भाजीबाजार नुकतीच राज्यातील सात कृउबांना वर्धा कृउबाच्या संचालकांनी भेट दिली. सातही कृउबांमधील सुविधांचा तुलनात्मक विचार केला असता बारामती कृउबाला संचालकांनी प्रथम पसंती दर्शविली. तर द्वितीय पसंती नगर कृउबाला संचालकांनी दिली. दोन्ही कृउबाचे अवलोकन करून वर्धेतील नवीन भाजी बाजार तयार करण्यात येणार आहे. सदर अत्याधुनिक पद्धतीच्या भाजीबाजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे वर्धा कृउबाचे सभापती श्याम कार्लेकर यांनी कळविले आहे.