शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दिघेंच्या राजीनाम्याचे कनेक्शन जि.प.तील भ्रष्टाचाराशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:34 IST

भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट क्षेत्रावर प्रभाव पडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय जनता पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील निष्ठावंत शिलेदार अशी ज्यांची ओळख आहे, त्या किशोर दिघे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दिघे यांच्या या राजीनाम्याचे कनेक्शन भारतीय पक्षाची सत्ता असलेल्या वर्धा जिल्हा परिषदेच्या गैरकारभाराशी असल्याचे जवळपास उघड झाले आहे.भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत भगवानजी आंबटकर यांनी किशोर दिघे यांना राजकारणात आणले होते. मागील २८ ते ३० वर्षांपासून दिघे हे भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत. एवढेच नव्हे, तर हिंगणघाट मतदारसंघाचा ते एक मोठा आधार राहिले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी या भागात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचा मोठा प्रयत्न केला. दिघे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘विपुल’ प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा थेट आरोपच दिघे यांनी केला होता. या दृष्टिकोनातून त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर अनेकवेळा पुराव्यासह आपली बाजू मांडली. पक्षाचे नाव खराब करणाºया लोकांचे काही तरी करा, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, याबाबत पक्षाच्या स्तरावरून प्रचंड उदासीनता बाळगण्यात आल्याने अखेर नाराजी असलेल्या दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील असल्याने दिघे यांची मोठी अडचण झाली होती. सर्वसामान्य लोक जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचाराकडे बोट दाखवित होते. त्यामुळे अखेरीस पक्षाच्या पदाचा त्याग करण्याची भूमिका घेतली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यासंदर्भात आॅडिओ क्लिपही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यातील संभाषण हे दिघेंचे असल्याची या भागात चर्चा आहे. दिघे यांनी आपल्या राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्याकडे पाठविला आहे. यासोबतच पक्षाचे संघटन मंत्री विदर्भ डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्याकडेही पाठविला आहे. पक्ष या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.