शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे अडचण

By admin | Updated: January 10, 2015 23:01 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन

वर्धा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांसंदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक बोलविणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांबाबत चिंता व्यक्त करीत शासन लवकरच रिक्त पदे भरेल व त्यासाठी लागणारे शासन आदेश निर्गमित करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. निवेदनानुसार महाराष्ट्र विकास श्रेणी अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षकांना वर्ग २ च्या पदावर पदोन्नती मिळण्याची कार्यवाही करण्यात यावी, आरोग्य विकास आकृतीबंध मंजुर करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लोकसंख्येनुसार आरोग्य सहाय्यक महिलांची शासन निकषा प्रमाणे दोन पदे मंजुर करण्यात यावी, डॉ. खानंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानुसार विनाविलंब कार्यवाही करण्यात यावी, मुख्य लेखा शिर्ष २२११ व २२१० अंतर्गत शासन निर्णयाप्रमाणे मंजुर पदे कायान्वित करणे, आरोग्य सहाय्यक पुरुषांच्या वेतनत्रृटीतील तफावत दुर करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षणास मुदत वाढ द्यावी, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कुष्ठरोग तंत्रज्ञ यांची पदे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पूर्वीप्रमाणे नियमित करावे, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना मिळणारे दरमहा मानधन १२०० रुपयांवरून महाराष्ट्र राज्याच्या किमान वेतनानसुार १५ हजार करावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन/जि.प. सेवेत सामावून घेण्यात यावे इत्यादी मागण्यावर यावेळी चर्चा करण्यात आल्या.शिष्टमंडळात राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाने, सिद्वार्थ तेलतुंबडे, अध्यक्ष प्रभाकर सुरतकर, सचिव रतन बेंडे, कार्याध्यक्ष सुजाता कांबळे, उपाध्यक्ष विजय जांगडे, कार्यकारी सचिव दीपक कांबळे, बाबाराव कनेर, शंकर हाते, सुहास कुंटे, प्रकाश मुरमे, ओमनाथ बावणे, हिवसे यांच्च्यासह इतरही कर्मचारी वर्गाचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)