शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
4
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
6
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
7
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
8
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
9
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
10
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
11
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
12
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
13
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
14
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
15
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
16
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
17
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
18
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
19
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
20
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

गतिरोधकच ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: May 6, 2016 01:59 IST

शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत.

अपघातास कारणीभूत : उंच गतिरोधक काढून टाकण्याची मागणीवर्धा : शहरात काही दिवसांपासून नागरिकांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे आवश्यकता नसताना ठिकठिकाणी उंच गतिरोधक निर्माण केले आहेत. सदर गतिरोधक सिमेंट काँक्रीटचे असल्याने वाहन चालकांना अधिकच त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही मापदंडात न बसणारे हे गतिरोधक अनेक आजारांचे कारण ठरत आहे. बांधकाम विभाग व पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर गतिरोधक काढावे, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.शहरातील प्रत्येक मार्गावर नागरिकांनी कुणालाही न विचारता उंच गतिरोधकांची निर्मिती केली आहे. सिमेंट काँक्रीटपासून बनविलेले हे गतिरोधक शासनाच्या कुठल्याही मापदंडात बसत नाही. परिणामी, नागरिकांना शहरातील प्रत्येक रस्त्याने जाताना गतिरोधकांचा सामना करावा लागतो. गतिरोधक डांबराचे नसून सिमेंट काँक्रीटचे केल्याने त्याची उंचीही कमी होत नाही. वाजवीपेक्षा अधिक उंच गतिरोधक निर्माण केल्याने वृद्ध व महिलांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. काही रस्त्यांवर तर असंख्य गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत. परिणामी, बहुतांश नागरिक तो रस्ताच नको, असे म्हणत दुसऱ्या रस्त्याचा अवलंब करीत असल्याचे दिसते. हा प्रकार विशेषत: अष्टभूजा चौकातून रामनगरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत घडतो. उंच गतिरोधक व त्यावर पांढरे, पिवळे पट्टे नसल्याने ते दिसत नाही. परिणामी, नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वंजारी चौक ते लेप्रेसी फाऊंडेशनपर्र्यंत तब्बल १६ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. ते फार जवळ जवळ असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, इतक्या जवळ गतिरोधकाची गरज नाही. शहरातील बहुतांश वॉर्डात घरांचे बांधकाम सुरू असते. कुणाचीही पर्वा न करता घरासमोरून वाहने जातात म्हणून परवानगी न घेता स्वत:च्या घरासमोर गतिरोधक तयार केले जातात. हाच प्रकार या भागात घडल्याचे दिसते. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत गतिरोधक काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)