शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन व्यवहारात एटीएममुळे अडचणी

By admin | Updated: April 25, 2017 01:00 IST

नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत.

नागरिकांची भटकंती : ‘नो कॅश’ आणि ‘एटीएम बंद’च्या फलकांमुळे गोचीवर्धा : नोटबंदीनंतर मोठा कालावधी लोटला असताना दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. सर्वत्र ‘डिजिटल पेमेंट’वर भर दिला जात असला तरी शहरातील बहुतांश व्यवहार ‘कॅश’नेच करावे लागतात. यात नो कॅश व एटीएम बंद आहे, या फलकांनी नागरिकांची चांगलीच बोळवण केली आहे. परिणामी, दैनंदिन व्यवहारच अडचणीत आले आहेत.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने नागरिकांची रकमेकरिता भटंकती होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोख रकमेकरिता भर उन्हात या एटीएमवरून त्या एटीएमवर भटकावे लागत असून निराश होऊनच परतावे लागत आहे. महाराष्ट्र बँकेचे बॅचलर रोडवरील एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहे. नो कॅशचा फलक गळ्यात अडकलेला दिसतो. याबाबत नागरिकांनी व्यवस्थापनाला सूचित केले; पण दुर्लक्ष केले जात आहे. चलन तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चलन तुटवडा आहे तर खासगी बँकांचे एटीएम कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकेतील काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांच्या सेवेकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली; पण एटीएम सदैव बंदच असतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)बॅँकेतील नोटांच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय ठप्परोहणा - नोटाबंदीच्या निर्णयापासून ग्रामीण भागातील बँकांना मागणीच्या प्रमाणात पतपुरवठा होत नाही. परिणामी, खातेधारकांना आवश्यक रक्कम देत नसल्याने ग्रामीण भागातील लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकामधील रकमांची स्थिती अद्याप पूर्वस्थितीत आली नाही. शासन कितीही घोषणा करीत असले तरी ग्रामीण भागातील बँकांतून ग्राहकांना आपल्या खात्यातून आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाही. यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तुंची खरेदी करता येत नाही. दहा हजारांचे काम दोन हजारांत भागवावे लागत आहे. परिणामी, बाजारातील खरेदीवर विपरत परिणाम झाला असून ग्रामीण भागातील व्यावसायिक हातावर हात धरुन बसून आहेत. याउलट शेतकरी आपला शेतमाल शहराच्या बाजारपेठेत आणून विकतो. यामुळे आलेल्या रकमेतून शहरातूनच आवश्यक वस्तुंची खरेदी करतो. परिणामी, शहरी व्यावसायिकांना ग्राहक मिळतात तर ग्रामीण भागातील लहान-मोठ्या दुकानदारांची दररोजची आवक मंदावली आहे. यासाठी बँकेतून मिळणाऱ्या रकमेत सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)