शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

माणसामाणसांतील भेद, विश्वशांतीतील अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:33 IST

आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते.

ठळक मुद्देएस. एन. सुब्बाराव : आयटीआय टेकडी परिसरात ग्रामजयंती समारोप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपणास खऱ्या अर्थाने माणूसपण राखायचे असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खात समरस व्हावयास पाहिजे. आपण दुसऱ्यास समजून घ्यायला पाहिजे, तरच ते तुमची किंमत करेल. माणसाचे मोठेपण मर्यादित जीवनात नाही, ते सामूहिक जीवनात आहे. प्रार्थना ही आपल्यासाठी मांगल्य निर्माण करते. आज माणसामाणसात भेद हा विश्वशांतीत सर्वांत मोठी अडचण असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आह, असे विचार ज्येष्ठ गांधी विचारक तथा राष्ट्रीय युवा योजना निदेशक डॉ. एस. एन. सुब्बाराव, नवी दिल्ली यांनी सामुदायिक प्रार्थनेविषयी व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिक बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ व निसर्ग सेवा समितीच्या वतीने संयुक्तरीत्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामजयंती समारोपीय कार्यक्रमाचे आॅक्सिजन पार्क, निसर्ग हिल्स आयटीआय टेकडी परिसरात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी इंजि. भाऊ थुटे, बाबाराव राऊत, मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे उपस्थित होते.१ एप्रिल ते २९ एप्रिल संपूर्ण महिन्यात घरोघरी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ३० एप्रिलला सकाळी सामुदायिक ध्यान परिपाठ व प्रभातफेरी काढण्यात आली. दीपोरीचे हेमंत टाले यांनी ध्यानाचे महत्त्व विशद केले.प्रमोदिनी मनोहरराव कोरडे स्मृतिप्रीत्यर्थ, ग्रामजयंती महोत्सव निमित्ताने यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.डॉ. सुब्बाराव यांनी वयाच्या ८७ वर्षीही आपल्या भारदस्त आवाजात एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.ज्येष्ठ नागरिक बचत गटाचे अध्यक्ष बाबाराव राऊत, जेष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, प्रदीप दाते, डॉ. राम ठोंबरे, प्रकाश येंडे, यांनी ग्रामजयंतीवर आपले अनुरूप असे विचार व्यक्त केले.प्रदीप दाते यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीत निवड झाली त्याबद्दल व वृक्षमित्र हेमंत टाले दिपोरी, देहदान संकल्प करणाºयाचा ग्रामगीता देऊन डॉ. सुब्बाराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निरंजनअप्पा एरकेवार, तर बा. दे. हांडे व डॉ. शोभा बेलखोडे यांनी संचालन केले.पतंजली योग प्रशिक्षण वर्धा जिल्हाध्यक्ष दामोदर राऊत व रवी खाडे यांनी वातावरण निर्मितीकरिता साधारण असेच गीत सादर केले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शेख हाशम, चंद्र्रशेखर दंढारे, रामभाऊ सातव, शोभा लंगडे, बाबाराव सावरकर, रमेश खुरगे, अरविंद भोयर, विजय ढोकळा, सुरेशचंद्र मांढळे, नरेश, ज्योती, अशुभ अग्रवाल देवळी, प्रकाश कदम, अ‍ॅड. भोयर, अमृता मडावी उपस्थित होते. उपस्थितांनी आॅक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता रितेश निमसडे, अविनाश भडे, विकास देशमुख, सागर मसराम, विठ्ठल गेडाम, डॉ. विक्रम बेलखोडे, शरयू आदींनी सहकार्य केले. निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला बचत गट, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.