शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

डिझेलचे भाव घसरले, तिकीट दरही कमी करा

By admin | Updated: December 24, 2014 23:06 IST

डिझेल दर कमी झाले, आता एसटीच्या तिकीटाचे दर कमी करावे, असा सूर येथील प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे.

तळेगाव (श्या.पं.) : डिझेल दर कमी झाले, आता एसटीच्या तिकीटाचे दर कमी करावे, असा सूर येथील प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे. दर महिन्याला डिझेल दरात वाढ होत असताना दर महिन्याला एसटीच्या तिकीट दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली, परंतु गेल्या महिन्यांपासून डिझेलचे दर ८ ते १० रूपयाने कमी झाल्यामुळे एसटी तिकीटाचे दर मात्र कमी करण्यात आले नाही. त्यामुळे डिझेलचा फटका गरीब प्रवाशांना अद्यापही सोसावा लागत आहे. डिझेलच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्यामुळे त्वरीत एसटी बसचीही भाडेवाढ कमी करावी, असा सूर सामान्य प्रवाशांकडून ऐकायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी डिझेलचे दर प्रतिलिटर ६७ रूपये ८० पैसे होते. त्यात तीन ते चारवेळा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आले. आता मात्र डिझेलची किंमत प्रतिलिटर ५७ रूपये ८ पैसे इतकी आहे. मागील दरापेक्षा तब्बल १० रूपये प्रतिलिटर मागे कपात करण्यात आली असताना मात्र गोरगरीबाची जीवनदायी एसटीबस भाडे वाढ मात्र अद्यापही कायम आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे खाजगी प्रवासाकडे जनतेचा कल वाढताना दिसून येते आहे. परिणामी एसटी बसेस रिकाम्या धावत असून अवैध प्रवासी वाहतूक दराचे उत्पन्न वाढत आहे. रोजंदारीसाठी गावाकडून शहराकडे जाणारा मजूरवर्ग एसटीने प्रवास करतो. दोनॉवेळच्या अन्नासाठी तो १० ते १५ कि़मी. अंतर करून रोजंदारीसाठी शहरात येतो. ये-जासाठी पन्नास रूपये रोज प्रवास भाडे माजोवे लागते. मिळणारी मजुरी केवळ २०० रूपये इतकी असते. त्याला दीडशे रूपयामध्ये तो आपल्या संसाराचा गाढा चालवितो. त्यामुळे हेच का ते अच्छे दिन, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारताना दिसून येत आहे.(वार्ताहर)