शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

विवाहविषयक बाबींवर संवाद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:56 IST

आपल्याकडे विवाहासारख्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत सामाजिक-धार्मिक अटी व बंधनामुळे मोकळा संवाद होत नाही.

ठळक मुद्देसुरेखा तायडे : विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपल्याकडे विवाहासारख्या मानवी जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत सामाजिक-धार्मिक अटी व बंधनामुळे मोकळा संवाद होत नाही. परिणामी आज भारतीय विवाह संस्था वाढत्या घटस्फोटांच्या संख्येने व पती-पत्नीतील दुराव्यांमुळे कमकुवत ठरत आहे. हे टाळायचे असेल तर आता विवाहापुर्वीचं मुलामुलींचे मानसिक, वैद्यकीय, सामाजिक व कायदेशीर समुपदेशन होणे काळाची गरज आहे, असे मत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम येथील प्रसुतीतज्ज्ञ डॉ. सुरेखा तायडे यांनी मांडले.प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय येथे महिला तक्रार निवारण समितीने विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात त्या साधन व्यक्ती म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये, जिल्हा सत्र न्यायालयाचे अ‍ॅड. अजित सदावर्ते, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर उपस्थित होते.दुसºया सत्रात ‘महिलांविषयक कायदे’ या विषयावर बोलतांना अ‍ॅड. सदावर्ते म्हणाले, नितिमत्तेने माणुस वागला तर कायद्याची गरज पडणार नाही. त्यामुळे कुटुंबातूनच मुलामुलींवर नीतीमत्तेचे संस्कार झाले तर विवाह हा आनंददायीच होईल.तिसºया सत्रात डॉ. निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या धावपळीत कुटुंबातून मुलामुलींना अत्यावश्यक घरगुती कामे शिकविली जात नसल्यामुळे विवाहानंतर कामाची सवय नसणे हाच मोठा प्रश्न बनून कौटुंबिक सौख्य लोप पावते. अनेकदा क्षणिक आकर्षणातून मुली स्वत:ची फसगत करुन घेतात. त्यामुळे मुलींनी अधिक चौकस व सजगपणेच आपला जीवनसाथी निवडायला हवा असे ते म्हणाले.कार्यशाळेला न्यू इंग्लिश हायस्कूल, लोक महाविद्यालय, सेंट जॉन हायस्कूल, कन्या विद्यालयातील शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थिती होत्या. कार्यक्रमातील विविध सत्राचे संचालन डॉ. सोनाली सिरभाते, डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. अनिता देशमुख यांनी केले. प्रा. मदनमोहन विश्वकर्मा, डॉ. सुधाकर सोनोने, डॉ. मालिनी वडतकर डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. रेखा बोबडे, प्रा. मृणालिनी गुडदे, प्रा. अमोल घुमडे, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. दीपक महाजन, विजय चौधरी, विनोद बावणे, दिनेश भगत, राजू मुंजेवार, प्रमोद माथनकर, नरेश आगलावे यांनी सहकार्य केले.महिलांना हक्क व कायदे विषयक मार्गदर्शनवर्धा - यशवंत महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे हक्क व कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. समितीच्या प्रमुख डॉ. कल्पना कुळकर्णी यांनी चर्चासत्राचे आयोजन केले. बाहेरगावावरुन महाविद्यालयार येणाºया विद्यार्थिनींना छेडछाड, पाठलाग, अश्लील बोलणे याचा नेहमीच सामना करावा लागतो. समाज काय म्हणेल, घरचे आपल्यालाच दोष देतील या भीतीने त्या हे सगळे लपवून ठेवतात. त्यामुळे त्रास देणाºया उनाड मुलांचे धैर्य वाढते. याचे कालांतराने परिवर्तन विनयभंगात होऊ शकते. हे टाळावयाचे असेल तर सर्वप्रथम विद्यार्थिनींना स्वत:च्या हक्काची जाणीव असणे आवश्यक आहे. तसेच कायद्याचा अधिकार कसा वापरु शकतो याविषयी न्यायाधीश अपूर्वा भासारकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयात किंवा बाहेर असताना कोणालाही मोबाईल नंबर देऊ नये, तसेच विलंब न करता त्या व्यक्तीविरुद्ध समितीकडे लगेचच तक्रार करावी, दुष्टचक्रात अडकण्यापासून स्वत:ला वाचवावे असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले. संचालन डॉ. सिंघम यांनी तर आभार प्रा. चंदनकर यांनी मानले.