शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धुळपेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:19 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो.

ठळक मुद्देतळेगाव (टालाटुले), चिकणी (जामणी) येथे कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असताना तळेगाव परिसरात शेतकऱ्यांनी धुळपेरणीला सुरुवात केली आहे. या भागात शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय असल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी धुळपेरणी करतो. यातील काही शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर धुळपेरणी करतो तर काही शेतकरी निसर्ग राजाच्या भरोशावर पेरणी करतो. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी धुळपेरणी करीत असल्याने धुळपेरणी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. मागील वर्षी या भागात ८० टक्के शेतकऱ्याने मृग नक्षत्रात म्हणजे ७ ते १० जूनपर्यंत पेरणी केली व सतत चार दिवस वरूणराजा बरसल्याने या भागातील ८० टक्के पेरण्या साधल्या. ११ व १२ जून रोजी लागवड केलेल्या शेतकऱ्याला पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे मागावून झालेल्या पेरणीने मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट आली. त्यामुळे दरवर्षी येथील शेतकरी धुळपेरणीला जास्त महत्व देताना दिसत आहे.उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी बैलाच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली. काही मशागतीची कामे अंतिम टप्प्यात येत आहेत. शेतकरी मान्सूनपूर्व शेतीची कामे आटोपत आहे. यावर्षी हवामान विभागाने १३ जुननंतर मुंबईत पावसाचे संकेत दिल्याने पेरणी १५ जून नंतर होईल असे दिसत आहे. शेतीच्या कामाबरोबर शेतकरी बियाणाच्या दुकानात गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. अजूनही शेतकऱ्यांना बॅँकेतून कर्ज मिळायचे असल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी सावकाराचे दार ठोठावत आहे. कारण पेरणीचा हंगाम येवूनही बॅँकेतून कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी बियाणे खरेदीसाठी दारोदार फिरताना दिसत आहे.ज्या शेतकऱ्याजवळ पैशाची सोय आहे ते नगदी पैशाने बियाणे खरेदी करीत आहे व ज्याच्याजवळ पैशाची सोय नाही ते शेतकरी पैसे जुळवण्यासाठी धावपळ करीत आहे. तळेगाव येथील रामुजी बोरीकर या शेतकऱ्याने सहा एकर जागेत ५ जूनला कपाशी पेरणी केली आहे. तर एकुर्ली येथील शेतकरी प्रमोद काटकर यांनी १ जूनला एक एकर जागेत लागवड केली व त्यांची कपाशीही उगवली. दीड एकर चवºया पिकामध्ये मलचींग पेपरवर चवरा असून त्यामध्ये कपाशी लावली व दीड एकर जागेत ६ जूनला धुळपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्याजवळ सिंचनाची सोय आहे. या शेतकऱ्यांनी लागवड करण्यास सुरुवात केली असून शेतकरी धुळपेरणीसाठी मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. शेतकरी बियाणे जुळवा जुळव करण्याच्या स्थितीत असून मशागतीचीही कामे आटोपत आहे.दरवषीप्रमाणे यावर्षीही आपण १ एकरात धुळ लागवड केलेली आहे. १ जूनला लागवड करण्यात आली. कपासी उगवली आहे. त्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे.प्रमोद काटकर, शेतकरी, एकुर्ली

टॅग्स :agricultureशेती