मुंबई येथे विशेष कार्यक्रम : रविवारी होणार विद्यार्थी रवानाहिंगणघाट : शहरातील विद्यार्थी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राज्याच्या विकासाबद्दल आपल्या कल्पना मांडणार आहे. हा पहिलाच प्रसंगी असून शहरासाठी अभिमानास्पद ठरत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी मुंबई येथे एनएससीआय स्टेडियमवर विशेष कार्यक्रम आयोजित आहे. यात जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे. कोणत्याही सरकारद्वारे मुख्यमंत्र्यांसमोर विकासाच्या आपल्या कल्पना मांडण्याची संधी देण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. यात हिंगणघाट येथूनही विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नयन तुराळे, माणिक लाजूरकर, रोहण ढेपे व कुणाल मोरे हे चार विद्यार्थी मुंबई येथे जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये युवक, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व औद्योगिक विकासातील विशेषज्ञ यांच्याशी विचार मंथन करून राज्याच्या विकासासाठी नवीन रोडमॅप सादर करणार आहे. यात राज्यातील १०० पेक्षा अधिक शहरांतून आलेल्या १० हजार विद्यार्थ्यांद्वारे मुख्यमंत्री राज्यात विकासाचा नवीन अध्याय सुरू करणार आहे. विद्यार्थी १०० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे विकासासाठी सर्जनशील व अभिनव संकल्पनांवर आधारीत प्रदर्शन भरविणार आहे. यात नवीन संकल्पना व आगामी विकासाची रूपरेषा प्रस्तुत केली जाणार आहे.(तालुका प्रतिनिधी)
शहरातील चार विद्यार्थी मांडणार मुख्यमंत्र्यांसमोर विकासाच्या कल्पना
By admin | Updated: April 30, 2017 01:05 IST