शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

विकसित ‘सेलू तालुका’ ठरतोय ‘मृगजळ’

By admin | Updated: May 13, 2015 01:54 IST

जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेला सेलू तालुका विकासाचे स्वप्न पाहत आहे;

विजय माहुरे  सेलूजिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेला सेलू तालुका विकासाचे स्वप्न पाहत आहे; पण अद्यापही गावाचा विकास होताना दिसत नाही़ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले; पण विकासाचे स्वप्न दिवास्वप्नच ठरणार काय, असा प्रश्न तालुक्यातील नागरिक उपस्थित करीत आहे़ राजकीय व प्रशासकीय उदासिनतेमुळे सध्या सेलू तालुका भकास झाल्याचे चित्र असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़राजकीयदृष्ट्या या तालुक्याचा जिल्हास्तरावर दबदबा कायम राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तीन जिल्ह्याचे प्रतिनिधित्व आमदार वसंत वानखेडे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विजय जयस्वाल, चित्रा रणनवरे व प्रकाश करनाके यांना मिळाले आहे. वर्धा विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या या तालुक्यातील राजकीय नेत्याला विधानसभेत आमदार म्हणून स्थान मिळाले नसले तरी तालुक्यातील मतदारांचा कौल निर्णायक राहिला आहे़ असे असले तरी पांदण रस्त्याच्या कामाला गत दहा वर्षांपूर्वी दिलेली गती प्रतिनिधी बदलताच मंदावल्याचे चित्र आहे़ सेलू तालुक्यात तीन कारखाने उभे राहिले होते़ काही वर्षे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली; पण माशी कुठे शिंकली, हे कळण्यास मार्ग नाही़ हिंगणी, केळझर व जामणीचा कारखाना बंद पडला. जामणीचा कारखाना अखेर विकला गेला. आज तो सुरू असला तरी शेतकऱ्यांच्या भांडवलाच प्रश्न आजही कायम आहे. हिंगणी व केळझरचा कारखाना आजही बंद स्थितीत असून ते पुन्हा सुरू होतील काय, हा प्रश्न कायम आहे़ राजकीय पुढारी याबाबत स्तब्ध दिसून येतात़ बागायती शेतीचा तालुका असला तरी अद्याप ‘केळी प्रक्रिया उद्योग’ उभा राहिलेला नाही. सध्या तर केळीच्या बागाही या तालुक्यातून हरवल्याचेच चित्र आहे़ विकासापासून कोसोदूर असलेल्या सेलू तालुक्यात अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे़ अनेक सरकारे बदलली; पण अद्यापही तालुक्याला विकासाचा सूर गवसला नाही. याला राजकीय उदासिनता तर कारणीभूत नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे़ निवडणुकाच्या वेळी आश्वासने दिली जातात; पण त्या समस्या सुटतच नसल्याचे वास्तव आहे़शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होते की नाही, याची कारणमिमांसा होणे गरजेचे झाले आहे. हागणदारी मुक्त तालुका, निर्मलग्राम, सिंचन विहीर, स्वच्छता अभियान आजही दूर गेल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या विकासाला गती देणारा लोकप्रतिनिधी हवा, असे तालुकावासियांना वाटणे स्वाभाविक आहे. सेलू हे गाव आता शहर झाले आहे. नगरपंचायत म्हणून उदयास आले खरे; पण दोन महिने होऊनही मुख्याधिकारी नाही़ यामुळे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत़ तालुक्यातील व्यक्ती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्यांचीच सत्ता व त्यांचेच आमदार आहे़ मग, सेलू तालुक्यावर बुरे दिन का, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत़ पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या अडचणी दूर करण्यासाठी असते; पण येथे तक्रारींचा निपटारा करण्यासाठीही चालढकल करण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. यामुळे विकासाला खिळ बसत असल्याने तालुक्याचा विकास दिवास्वप्नच ठरत आहे.जंगलांचा वेढा, सिंचन प्रकल्प, तीर्थक्षेत्र, नागपूर-वर्धा राज्य मार्ग, दळणवळणाची साधने, भौगोलिक रचना सर्वच अनुकूल असताना सेलू तालुक्याचा विकास रखडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात़ नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर जवळ असताना सेलूचा विकास होत नसल्याने रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे़ पर्यटन विकासाकरिता शासन प्रयत्नशील आहे़ बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला; पण ज्या तालुक्यात हे अभयारण्य आहे, तथील विकासाला फाटाच दिला जात असल्याचे दिसते़ लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे लक्ष देत सेलूच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत़