शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उजळणार दोन रस्त्यांचे भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:38 IST

स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता.

ठळक मुद्देगोदावरी व टेकोडा या दोन्ही रस्त्यांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत गोदावरी रस्ता डांबरीकरण केला नव्हता. तीन किमी अंतर मातीतून पार करावे लागत होते. टेकोडा रस्ताही रेतीघाटांमुळे दबला होता. याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली.गोदावरी पोच रस्ता तीन किमी लांबीचा आहे. वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या गावात जायला रस्ता नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात पाणी आल्यावर चिखल तुडवीत मार्ग काढावा लागत होता. प्रकृती बिघडल्यावर रुग्णांना खाटेवर टाकून चार-पाच लोकांमिळून मुख्य मार्गावर आणावे लागत होते. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सदर रस्ता जि.प. बांधकाम विभागाकडे होता; पण निधी नसल्याने रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. यासाठी माजी आमदार केचे यांनी २००९ पासून शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.टेकोडा अ‍ॅप्रोच रस्ता दीड किमी लांब आहे. या रस्त्याचे १९९८ मध्ये डांबरीकरण झाले होते; पण रेतीची अवजड वाहतूक झाल्याने पूर्ण रस्ता मातीत दबला. यामुळे बैलबंडी चालविणे तारेवरची कसरत होती. दोन्ही रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाची मागणी ग्रामस्थ केचे यांच्याकडे करीत होते. शेवटी गोदावरी व टेकोडा रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या २०१७-१८ च्या बजेटमध्ये या रस्त्यांना प्राधान्य देऊन मंजुरी देण्यात आली. वर्षभरात दोन्ही रस्ते पूर्ण होईल, असेही केचे यांनी सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अंकिता होेले, पं.स. सभापती नीता होले, राहुल बुले, शहराध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, भाजप तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, गजानन भोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.अवजड वाहतूक अधिकगोदावरी आणि टेकोडा ही दोन्ही गावे रेतीघाटांची आहेत. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक अधिक असते. परिणामी, रस्ते लवकर खराब होतात. यामुळे दोन्ही गावांत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती गरजेची आहे.