शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग कोमात; कोविडला आवतन मिळतेय जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा : अधीक्षक करताहेत जिल्ह्याबाहेरून अप-डाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून सध्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. बियाणे आणि खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे. शिवाय त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाकडे दिली आहे; पण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्याबाहेरून अप-डाऊन करीत आहे. शिवाय प्रत्यक्षात फिल्डवर जाण्याचे टाळत असल्याने कोरोनासाठी खबरदारीचा उपाय असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा कृषी केंद्रांमध्ये फज्जा उडत आहे.जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. याच कृषी केंद्रांमध्ये सध्या शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर आदींचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी केंद्रांमध्ये कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये, या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घ्यावे, येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. परंतु, वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी तोबा गर्दी होत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. इतकेच नव्हे तर काही कृषी केंद्रांमध्ये ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधाही नसल्याचे बघावयास मिळते. सोशल डिस्टन्सिंगकडे पाठ दाखवत कृषी केंद्रांमध्ये होणारी गर्दी कोविड-१९ या विषाणूच्या झपाट्याने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहे. तर कृषी केंद्र व्यावसायिकांना वटणीवर आणण्याची जबाबदारी असलेला कृषी विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.भरारी पथक नावालाच?बोगस बियाण्यांना अटकाव घालण्यासाठी कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आली आहे. शिवाय कृषी केंद्रांची तपासणीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. परंतु, या भरारी पथकातील काही अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याने सदर भरारी पथक नावालाच काय, असा प्रश्न कृषी तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.अधीक्षक कार्यालयातून हाकताहेत गाडाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्यात अनिल इंगळे हे काम पाहत आहे. परंतु, ते सध्या प्रत्यक्ष फिल्ड करीत नसल्याचे आणि कार्यालयात बसूनच कामकाजाचा गाडा हाकत आहेत. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल ‘स्विच आॅफ’ होता.अर्धेअधिक साहित्य दुकानाबाहेरचअनेक कृषी केंद्र चालकांकडून त्यांच्या दुकानातील साहित्य दुकानांबाहेर ठेवले जात आहे. इतकेच नव्हे तर दुकानांसमोर मनमर्जीनेच वाहने उभी केली जात असल्याने त्या परिसरात बहूदा वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र व्यावसायिकांकडून करून घ्यावे. शिवाय जो कुणी कृषी केंद्र व्यावसायिक जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असेल त्याच्यावर दंडात्मकसह फौजदारी कृषी विभागाने करावी. कृषी विभागाचे अधिकारी हयगय करताना निदर्शनास आल्यास जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल.- सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती