शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरात डेंग्यूने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाह आरोग्य विभाग सुस्त : नागरिकांचा रोष, मृत बँक व्यवस्थापक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वातावरणामुळे आणि शहरात ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे आजारांनी डोके वर काढले आहे. अशातच डेंग्यूचा आजारही पाय पसरत असताना उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असतानाच साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा डेंग्यूने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साईनगरातील नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेसह नगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाले आहे. परतीच्या पावसानेही पुन्हा हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील काही परिसरात पाण्याचे डबके साचलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत आहे. मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात गवतही वाढलेले असल्याने डासांची निर्मिती होण्यास सर्वत्र पोषक वातावरण आहे. अशा स्थितीत नगर पालिकेने शहरातील प्रत्येक प्रभागात धुरळणी करणे आवश्यक आहे.मात्र नगरपालिकेतील अधिकारी वर्ग रजेवर असून पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने शहरात आजाराचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य यंत्रणाही कागदोपत्री आकडेमोड करण्यात व्यस्त असून घटना घडल्यावर किंवा ओरड झाल्यावरच घटनास्थळी पोहोचून वरातीमागून घोडे दामटवित आहे. आरोग्य यंत्रणा व नगरपालिकेच्या या निष्क्रीयतेमुळे साईनगरातील अतुल जिन्नेवार यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृत अतुल जिन्नेवार हे वर्धा नागरी बँकेच्या गांधीनगर शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दिवाळीपूर्वी ते आजारी पडल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यूचे निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. पण, तरीही आराम पडला नाही. यातच काविळनेही जोर केल्यामुळे त्यांना सावंगी आणि तेथून नागपुरला हलविण्यात आले. गुरुवारी उपचारादरम्यान रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कार्यतत्परता आणि सुस्वभावीवृत्तीमुळे सर्वपरिचित असल्याने ही दु:खद बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डेंग्यूसदृश आजाराचीच नोंदतापाने फणफणत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर खासगी रुग्णायलातील तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निदान करुन डॉक्टर उपचार सुरु करतात.पण; आरोग्य विभागाकडे डेंग्यू नाही तर डेंग्यू सदृश्य आजाराचीच नोंद होत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागिल महिन्यापर्यंत जिल्ह्यात ४० डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.साईनगर परिसरातील घटना कळल्याबरोबर आरोग्य विभागाची चमू त्या परिसरात पोहोचली. तेथील पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य यंत्रणाही लक्ष ठेऊन आहे. कुणालाही ताप आल्यास त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन वेळीच उपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.साईनगरातील अतुल जिन्नेवार यांचा आकस्मिक मृत्यू मनाला चटका लावून गेला. आरोग्य यंत्रणा आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. हा प्रभाग मोठा असून या ठिकाणी मोकळ्या जागाही भरपूर आहे. त्यामुळे या परिसरात धुरळणी करणे आवश्यक असल्याने तशी मागणी पालिकेकडे करण्यात आली.परंतु कर्मचाºयांची कमतरता आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हालाही काम करताना अडचणीचे जात आहे.- प्रदीप ठाकरे, नगरसेवक, साईनगर.