प्रकोप सुरूच : जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना पडताहेत थिट्याकेळझर : जिल्ह्यात डेंग्यूचा उदे्रक सुरू असून त्यावर प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभागाला सध्या तरी अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. यावर प्रतिबंध लावण्याकरिता उपाययोजना सुरू असताना केळझर येथे पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील सानिया अनिस शेख (१०) हिला १४ आॅक्टोबर २०१४ पासून ताप येत होता. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे समोर आले. अखेर तिच्या रक्ताची तपासणी केली असता तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गावातील शासकीय आरोग्य यंत्रणा याबाबत कुठलीही खबरदारी घेत नसल्याने त्या कुचकामाची ठरत असल्याचा आरोप होत आहे. गावात दिवसेंदिवस डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डासांच्या निर्मूलनाकरिता ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
केळझरमध्ये आढळला डेंग्यूचा रूग्ण
By admin | Updated: October 20, 2014 23:16 IST