शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलने व मोर्चापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:02 IST

राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : पत्र परिषदेत उपस्थित केला आरक्षणाबाबत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सर्वच सरकारने ओबीसींच्या मुळावर येणारे धोरण अंगिकारले. फक्त व्ही.पी.सिंग यांचे सरकार याला अपवाद ठरले. १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के ओबीसी असतानाही कुठे ६ टक्के तर कुठे १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे आता बहूजन व ओबीसी स्वस्थ बसणार नाहीत. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलने व मोर्चा काढून शक्ती खर्च करण्यापेक्षा मतपेटीतून शक्ती दाखविली जाईल, असे मत लोकजागरचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्र परिषदेतून व्यक्त केले.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेला लोकजागरचे महाराष्ट्र सचिव डी.व्ही.पडोळे, संयोजक बाबाराव भोयर व जिल्हाध्यक्ष मनीष नांदे उपस्थित होते. पुढे बोलतांना वाकुडकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून तो गोंधळ निर्माण करणारा आहे. आमचा कोणत्याही जातीच्या आरक्षणाला विरोध नाही, पण १६ टक्के आरक्षण कोणत्या आधारे जाहीर केले हा प्रश्नच आहे. आतपर्यंत एससी, एसटी व एनटी यांना संख्येप्रमाणे आरक्षण दिले.परंतू ओबीसींची संख्या जास्त असतानाही त्यांना सावत्रपणाची वागणूक मिळाली आहे. त्यामुळे ५२ टक्के लोकसंख्या असतांनाही आरक्षणात ओबीसींचा टक्का किती?असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने सर्व प्रवर्गाची जनगणना करावी, असेही ते म्हणाले.नव्या दमाचं नव नेतृत्वया दोन्ही पक्षांच्या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी आणि बहूजनांनी एकत्र येऊन नव्या दमाचं नव नेतृत्व देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुरुवातील वर्ध्यातच लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित केले होते. परंतू आता वाढता प्रतिसाद व नागरिकांच्या आग्रहास्तव सध्या पाच लोकसभा निवडणूकीसाठी नेतृत्व तयार केले जाणार असल्याचेही यावेळी ज्ञानेश वाकु डकर यांनी सांगितले.वर्ध्यात यात्रेचा होणार समारोपविदर्भात ‘ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार’ हे ब्रीद घेऊन निघालेल्या लोकजागर यात्रेचा समारोप ५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. सर्कस मैदानावर होणाऱ्या सभेला प्रमुख पाहूणे म्हणून बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप ढोबळे व पॉलिटिकल युनिटी कॅम्पेनचे संयोजक इस्माईल बाटलीवाला यांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला ओबीसी व बहुजन समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकजागर अभियानच्यावतीने करण्यात आले आहे.