शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:29 IST

शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरिता कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरिता कृउबास सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी एसडीओ समाधान शेंडगे यांना निवेदन दिले.शहरातील प्रमुख मार्गाने फिरून शेतकऱ्यांचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवेदनातून आंदोलकांनी शासनाने मागील वर्षी जाहीर केलेले सोयाबीनचे २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान त्वरित वाटप करावे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहीर करून एक वर्ष लोटले; पण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. शेतकरी कर्जमाफी योजनेतील संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून नवीन कर्जवाटप करण्याचे बँकांना आदेश द्यावे. शेतकरी आर्थिक संकटात सापडण्यास शासनाचे आयात -निर्यात धोरण, साठाबंदी कायदा व जीवनावश्यक वस्तू कायदा जबाबदार आहे. शासनाचे धोरण कारणीभूत असल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पडलेले असताना त्याचा फायदा सामान्यांना मिळत नाही. पेट्रोल, डिझेल व गॅस यावरील कर कमी करून आंतरराष्ट्रीय बाजार -भावाचा लाभ जनतेला देऊन दिलासा द्यावा. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरीची व्यवस्था करावी. वीज पुरवठा त्वरित द्यावा आदी मागण्या एसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत करण्यात आल्या.अ‍ॅड. कोठारी यांच्या नेतृत्वातील मोर्चात समुद्रपूर कृउबास सभापती हिम्मत चतुर, हरिष वडतकर, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, मधुसूदन हरणे, सुरेश सातोकर, राजू मंगेकर, विनोद वानखेडे, दिगांबर चांभारे, तेजस तडस, अशोक वांदिले, राजेश थोरात, सुरेंद्र कुकेकार, धनंजय बकाणे, भूषण पिसे यासह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा