शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

करंजी भोगेत आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:57 IST

तालुक्यातील करंजी (भोगे)चे उपसरपंच सुनिल भोगे यांच्या पुढाकारातून येथे शेतकरी आरक्षणाची मागणी विशेष ग्रामसभेत करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक नेरीचे सरपंच धनराज टुले यांनी केले.

ठळक मुद्देएकच मिशन शेतकरी आरक्षणाची सभा : शेकडो नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील करंजी (भोगे)चे उपसरपंच सुनिल भोगे यांच्या पुढाकारातून येथे शेतकरीआरक्षणाची मागणी विशेष ग्रामसभेत करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक नेरीचे सरपंच धनराज टुले यांनी केले.यावेळी टुले म्हणाले कि, गांधी आश्रम सेवाग्राम येथून सुरू झालेल्या शेतकरीआरक्षणाच्या चळवळीला बळकटी देण्यासाठी अनेक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. ग्रामसभेतील ठरावांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाकडे शेतकरी आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. २१ लाखांच्यावर समर्थकांसह महाराष्ट्रातील अनेक कृषि उत्पन्न बाजार समित्या, ग्राम पंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी याविषयी ठराव पारित करून शासनाकडे पाठविले आहेत. अनेक सरपंच, पं.स. सदस्य, जि.प. सदस्य, आमदार, खासदार, मंत्री यांनी शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांच्या या संकल्पनेशी सहमती दर्शविली आहे. शेतकरी अभ्यासक बुधाजीराव मुळीक, विजय जावांधिया व आमदार बच्चू कडू यांनीही याविषयी जाहीर समर्थन केले आहे.जिल्ह्यातील आर्वी कृषि उत्पन्न बाजार समिती, अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार समिती, वाशिम जिल्ह्यातील मालेगांव बाजार समितीसह वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी, सेलू, वर्धा व देवळी तालुक्यातील २३२ ग्राम सभांसह अमरावती जिल्ह्यातील धामनगाव, चांदूर आदी ९ ग्रामसभांचे ठराव मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. यवतमाळची कन्हाळगाव व घोडदरा, वाशिमची गोवर्धन, जळगाव जिल्ह्यातील नगाव व अहिरे बुद्रक, नाशिक येथील सिन्नर, सांगलीची शिरसगाव व बीड जिल्ह्यातील ७ ग्राम सभांचे ठराव पारित करून शैलेश अग्रवाल यांच्या संकल्पनेतील शेतकरी आरक्षणावर लोकसभेत प्रस्ताव पारित करण्याच्या मागणीसह पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. सरपंच नलू नेहारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत शैलेश अग्रवाल विशेष आमंत्रित व मुख्य वक्ते होते. यावेळी बोलतांना अग्रवाल म्हणाले की, नेमकी शेतकरी आरक्षणाची संकल्पना म्हणजे शेतकऱ्यांच्या आश्वस्त रक्षणासाठी दीर्घकालीन विकासात्मक उपाय योजना सांगणारी आहे. जातीच्या आरक्षणापेक्षा वेगळी व ज्यांना जातीचे आरक्षण असेलही तरी ग्रामीण जीवन प्रणालीसाठी हे मातीचे आरक्षण आवश्यक आहे. शेतकरी आरक्षणाची संकल्पना सांगतांनी ते म्हणाले, शेतकºयांच्या उत्पन्न वाढीच्या व नफा वाढविण्याच्या दृष्टीकोणातून त्यांना वीज, बियाणे, खते व औषधी मोफत द्यावे. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेत समान संधी देण्यासाठी उच्च शिक्षणात प्रवेशासंदर्भात आरक्षित करून संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे. पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांचा नफा वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मोफत पशुखाद्य व चारा द्यावा. दुधाची थेट उत्पादक ते ग्राहक व्यापार प्रणाली अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात दुग्ध पाकीट उत्पादक कंपन्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घालून दुधाला ७० ते १०० रुपये प्रतिलीटर दर द्यावा. विमा कंपन्यांना लाभदायी पीक विमा पद्धती बंद करून या आरक्षणातच पीक उत्पन्न किमतीचे संरक्षण द्यावे, अशी संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत अमोल भोगे, राहूल कडू, मनोहर दौड व ओमप्रकाश गुप्ता यांनी हा प्रस्ताव मांडला. ग्रा.पं. सदस्य सुरेश लोखंडे, शांता मडावी, अविनाश उईके, रुपाली सोयाम, अर्चना मून, रविराज घुमे, वैशाली घुमे यांनी अनुमोदन केले. बाबा दाते, विनोद महाजन, गजानन डंभारे, चंदू लाखे, आबाजी खडतकर आदीसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीreservationआरक्षण