शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

गारपीटग्रस्तांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाची मागणी

By admin | Updated: June 23, 2014 00:15 IST

फेबु्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.

वर्धा : फेबु्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. असे असले तरी बँकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बँकांना या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या सूचना देण्याच्या मागणीकरिता राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले आहे. कर्जाचे पुनर्गठन करण्याच्या शासनाच्या सूचना असताना बँकेकडून शेतकरऱ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना इंगाामाची जुळवाजुळव करण्याकरिता खासगी सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. या बाबीची दखल शासनाने घ्यावी व त्वरित पीक कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा स्वरूपाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.रायुकाँने दिलेल्या निवदेनानुसार, ज्या शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे आणि ज्यांना शासनाने आर्थिक मदत दिली आहे. अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश नुकतेच शासनाच्या सहकार विभागाने दिले आहेत. शिवाय या शेतकऱ्यांना थकीत कर्ज २०१४-१५, १५-१६ व १६-१७ या वार्षिक तीन हप्त्यात भरण्याची सवलत दिली आहे. सोबतच २०१४-१५ करिता पिककर्ज देण्याच्या सूचना शासनाने बँकांना केल्या आहेत. यासाठी २०१३-१४ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत संबंधीत बँकाना अदा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पुनर्गठन झाले, अशा शेतकरऱ्यांना २०१४-१५ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत बँकांना अदा करण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाला राष्ट्रीयकृत बँका अनभिज्ञता दाखवीत असून कर्जाचे पुर्नगठन व नवीन पीक कर्जाबाबत कुठलेही आदेश नसल्याचे राष्ट्रीयकृत बँका भासवित आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या गंभीर बाबीची शासनाने त्वरित दखल घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना कर्जाचे पुर्नगठन करण्याचे आदेश द्यावेत शिवाय या हंगामाकरिता पिककर्ज द्यावे, अशा सूचना द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेप्रसंगी पं.स. उपसभापती संदेश किटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, पिपरी मेघे ग्रा.पं.सदस्य अजय गौळकार, राविकॉ जिल्हाध्यक्ष राहुल घोडे, नरेश खोबे, प्रशांत ढगे, विशाल लोखंडे, अमिताभ अंसारी, परवेश शेख, दीपक चव्हाण, संयज कुनघटकर, संदीप दरणे, संदीप भांडवलकर, राजू बुधबावरे, विजय सावकर, अवधूत उडाण, रवी संगताणी, गजानन वानखेडे, पंकज कडू, राहुल तेलरांधे यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)