शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाची मागणी

By admin | Updated: August 6, 2014 23:59 IST

पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे

वर्धा : पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे अर्थसंकल्पात समावेश करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनानुसार, पुलगाव हे मध्यरेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. पुलगावला आशिया खंडातील सगळ्या मोठा किरकोळ आयुधाचा साठा असतो. तसाच डेपो आमला(म.प्र.) येथे आहे. या दोन्ही स्थानाचे संरक्षणदृष्ट्या महत्त्व आहे. पुलगाव येथे मोठ्या लाईनची मागणी जुनीच आहे. १९९७ मध्ये या मागणीचा विचार झाला, परंतु तत्कालीन संसद सदस्यांनी याचा पाठपुरावा न केल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. हे देखील निवेदनातून रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले आहे.पुलगाव आर्वी रेल्वे मार्ग इंग्रजांच्या काळापासून होता. निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात ही जागा गेली. त्यानंतर ही रेल्वे सुरू करण्याकरिता रोहणा परिसरातील जनतेने आंदोलन केले. परंतु त्याची दखल रेल्वे विभागाने घेतली नाही. हा मार्ग पुलगाव, आर्वी, तळेगाव, आष्टी, थार, बोटोणा, पार्डी, नारा, वाघोडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल असा असावा, अशी मागणी माजी खासदार विजय मुडे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)