शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची मागणी

By admin | Updated: February 16, 2017 01:26 IST

तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे.

व्यापाऱ्यांकडून लूट : अल्प भावात होते तुरीची खरेदी देवळी/कोळोणा (चोरे) : तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहराशी मोठा ग्रामीण भाग जुळलेला आहे. परिसरातील शेतकरीही येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. व्यापारी तुरीची अल्प भावात खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यामुळे देवळी येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी कोळोणा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. तूर काढणीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी तूर विक्रीला आणत आहे. देवळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. देवळी शहर ग्रामीण भागाशी जुळलेले असल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल माल येथे विक्रीला आणणे परवडतो; पण नाफेडची खरेदी नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ वा कळंब या ठिकाणी घेवून जावे लागते. या दूरच्या ठिकाणी माल घेऊन जाताना वाहतुकीचा दामदुप्पट खर्च करावा लागतो. पहिल्या दिवशी लिलाव न मिळाल्यास मुक्काम करावा लागतो. परिणामी, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देवळी शहरात व्यापाऱ्यांना तुरी विकल्यास अल्प भाव मिळतो. शेतकऱ्यांची आर्थिकता सावरायची असेल तर शासनाने तूर खरेदीसाठी नाफेडचे केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो. शिवाय व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या भाव पाडण्याच्या प्रक्रियेलाही लगाम बसेल. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाने त्वरित लक्ष देत नाफेडची तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी नरेश ओंकार, नंदू भस्मे, प्रशांत मुनेश्वर, रवींद्र उपाशे, नितीन मानकर, गजानन मोडक, पद्माकर कांबळे, धम्मा कांबळे आदींनी केली.(प्रतिनिधी/वार्ताहर)